न्यूज १८ लोकमत मध्ये मोठा बदल: मंदार फणसे उद्यापासून नवे संपादक


मुंबई - न्यूज १८ लोकमत या मराठी वृत्तवाहिनीमध्ये मोठा बदल होत आहे.  मंदार फणसे हे उद्या, २ सप्टेंबरपासून संपादकपदाची धुरा सांभाळणार आहेत.


मंदार फणसे हे न्यूज १८ लोकमत या वाहिनीसाठी नवीन नाहीत. यापूर्वी त्यांनी याच वाहिनीमध्ये संपादक निखिल वागळे यांच्यासोबत न्यूज एडिटर म्हणून पाच वर्षे आणि त्यानंतर महेश म्हात्रे यांच्यासोबत कार्यकारी संपादक म्हणून दोन वर्षे काम केले आहे. त्यांचा हा तिसरा कार्यकाल असून, यावेळी ते संपादक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.


फणसे यांच्याकडे चॅनलच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी असेल. टीआरपी वाढवणे, बातम्यांची गुणवत्ता सुधारणे आणि प्रेक्षकांना आकर्षित करणारे कार्यक्रम तयार करणे ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील.


न्यूज १८ लोकमत मधील या बदलामुळे मराठी वृत्तवाहिनी क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली आहे. फणसे यांच्या नेतृत्वाखाली चॅनल कशी कामगिरी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या