"स्मार्ट मित्र" चे स्मार्ट बॉस: 'सुट्टीचा राजा आणि बाकीच्यांचा वजीर'


मुंबईतील डिजिटल न्यूजच्या दुनियेत सध्या काहीतरी भन्नाट घडतंय, आणि याचा परिणाम म्हणजे काही लोक स्वतःला ‘द ग्रेट गॅम्बलर’ समजू लागलेत. एकदा जर डिजिटलला महत्व आलं की, 'कळसावरचा माणूस' व्हायची संधी काही जण सोडत नाहीत. 'न्यूज १८ लोकमत'मधल्या एका 'आशिक बनाया आपने' चा किस्सा तुम्ही 'बेरक्या' वर वाचला असेलच, पण आता 'स्मार्ट मित्र' च्या डिजिटल व्हिडिओ विभागाच्या सिनियर प्रोड्युसर हेडची कहाणी समोर आली आहे.


ही कहाणी अशीच नाही, तर थोडी रंगतदार आहे! हेड साहेब मागे एकदा एका गंभीर प्रकरणात अडकले होते, अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात! दोन महिने बिनपगारी रजा टाकून ते कुठेतरी गायब झाले होते. तेव्हा म्हणे त्यांच्या कुटुंबातलेही ते 'हेड' गहाळ झालेत का म्हणून विचारायचे! शेवटी जामीन मिळाल्यावर परत आले, पण येताना त्यांच्या चेहऱ्यावर 'विशाल' पराक्रम गाजवल्याचा गर्व. "मी आलोय, आता डिजिटल माझं!" असं काहीतरी सांगून उगाच हवेत उडू लागले.बड्या - बड्या गप्पा मारू लागले. 


साहेबांच्या डिजिटल साम्राज्यात नियम असे की, 'माझं काही झालं नाही' असं दाखवायचं, आणि ऑफिसातलं तापलं वातावरण म्हणजे उन्हाळ्यातली सनग्लासेस घालून फिरायची स्टाइल! साहेब तर इतके स्मार्ट आहेत की, सुट्टी हवी तेव्हा त्यांचीच असते! शुक्रवारी वर्क फ्रॉम होम, शनिवारी-रविवारी सुट्टी आणि आठवड्याचे तीन दिवस बाकीच्यांसाठी 'पिसाळलेल्या बॉस' च्या रूपात. बाकीच्यांना मात्र एखादा सुट्टीचा दिवस मिळाला, तर तो सुद्धा त्यांचं नशीब!


हेड साहेबांना बिझनेस हेडचा आशीर्वाद मिळालाय, त्यामुळे ते वाकडं जाणं तर दूरच, ते "माझं काही चुकू शकत नाही" अशा भ्रमात वावरत आहेत. पण त्यांच्या हाताखालील लोक मात्र मानसिक त्रासातून जाताहेत. साहेबांची लहर आली की, सुट्ट्यांवर बंदी, आजारी  असतानाही कामावर हजर. साहेबांचा उधळलेला वारू कुणी रोखणार का, असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय.


गेल्या काही दिवसात  तीन लोकांनी राजीनामे दिले आहेत आणि चौथा कुणी धाडकन देणार आहे. 'मी डिजिटलचा राजा' असं समजून मोकाट सुटलेला हा हेड साहेब खरंच किती काळ असेच चालणार, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या