टीआरपीच्या शर्यतीत 'पैसा बोलता है, बाबू!'


महाराष्ट्रात मराठी न्यूज चॅनेल्सच्या शर्यतीत, लँडिंग पेजच्या करामतीमुळे "न्यूज १८ लोकमत" आता थेट तिसऱ्या क्रमांकावर झेपावलं आहे! अंबानींच्या या चॅनेलला लक्ष्मीची कृपा होतीच, पण सरस्वती मात्र पाचव्या बाकावर रुसून बसली होती. आता मात्र सरस्वतीनेही लक्ष दिलंय, असं दिसतंय.


यासाठी चॅनल व्यवस्थापकांनी काही छोटे-मोठे प्रयोग नव्हे, तर चक्क कोट्यवधी रुपयांचा खर्च केलाय! एवढा पैसा उधळल्यावर काय, चॅनल थेट पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानी झेपावलं आहे. या सगळ्या जादूच्या मागे 'लँडिंग पेज'चा हाथ असल्याचं म्हटलं जातंय.


आता हे लँडिंग पेज म्हणजे काय तर टीव्ही चालू केल्यावर थेट न्यूज १८ लोकमत चॅनल समोर येणार. मग इतर चॅनेल्स शोधायला हवे तर बटन दाबा आणि एक मिनिट तरी घालवा. आणि हो, तो एक मिनिट टीआरपी मीटरमध्ये काऊंट होतोच होतो! बिचारे बाकीचे चॅनेल्स; त्यांनी कितीही चांगलं कंटेंट दिलं, तरी आधी लोकमतचं दर्शन होणार, असं ठरलंय!


एबीपी माझा आणि न्यूज १८ लोकमतमध्ये आता फक्त .1 चा फरक राहिलाय, त्यामुळे टीआरपीच्या खेळात झिरो अवर मॅडमना झिरो झाल्यासारखं वाटतंय. त्यांनी टीआरपी मीटरला विचारलं, "हे असं कसं झालं?" तर मीटरने सांगितलं, "पैसा बोलता है, बाई!"


लवकरच हा चॅनल पहिल्या क्रमांकावर जाणार, असं सांगितलं जातंय. कारण 'इन', 'जीटीपीएल', आणि आता 'सिग्नेट'सारख्या केबल नेटवर्क्सवर लोकमतचा कब्जा झालाय. आता टीआरपी का नाही वाढणार? पैसा खिशातून बाहेर पडलाय, आता टीआरपीनेच सन्मान द्यायचा आहे!


आम्हाला आधी वाटलं, संपादक बदलल्यानं चॅनलमध्ये चमत्कार घडले. मंदार फणसेंच्या येण्यामुळे फणस दरवळला असं समजत होतो. पण हे लँडिंग पेजचं गणित वेगळंच निघालं!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या