टीआरपीची बुलेट ट्रेन आणि गॉसिप एक्सप्रेस!

 


मुंबई - महाराष्ट्रातील ९ मराठी न्यूज चॅनल्समध्ये टीआरपीसाठी जोरदार लढाई सुरू आहे. त्यातच न्यूज १८ लोकमतने अचानक पाचव्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याने चॅनलवाल्यांच्या मनात एकाच प्रश्नाची लाट उसळली आहे - हे अचानक कसं काय? नावाप्रमाणेच त्यांनी ‘१८’ लँडिंग पेजेस विकत घेतल्याने टीआरपीचा थर्मामीटर उकळला, हे समजल्यावर बाकी चॅनलवाले म्हणाले, "आता समजलं!"


हा चॅनल कोणाचा? तर खुद्द उद्योगपती मुकेश अंबानी यांचा! पैसा भरपूर आहे, ते काहीही करू शकतात, असं बोललं जातंय. अंबानींसाठी टीआरपी मिळवणं म्हणजे हत्तीच्या सोंडेतून गुलाबजाम खाणं!


दुसरीकडे, ज्यांनी तब्बल १७ पैकी १४ वर्षे टीआरपीचा मुकुट घातला तो एबीपी माझा तीन वर्षांपासून मागे पडलाय. आता दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर सरकला आहे. शोभायात्रा चॅनलला आता झिरो अवर शोचं झिरो टीआरपी संकट आलंय. सरिता कौशिक मॅडम, ज्यांनी झिरो अवर शोचं नेतृत्व केलं, त्या आता म्हणतात, “मी तर या शोमध्ये अडकून पडले होते. सकाळी ११ पासून रात्री  ९ पर्यंत तेच ते ! बाकी आयुष्य केलं काय!”


एवढंच नाही, तर विधानसभा निवडणुकीत धावायचं आहे आणि टीआरपीच्या झोपडीत झिरो अवरमध्ये बसून राहिलं तर निवडणूक कोण बघणार? त्यामुळे कौशिक मॅडमनी शोला बाय बाय केलंय. आता मीडियात पसरलेल्या गॉसिप्सचा धुरळा तर उठलाच आहे, पण ‘अफवा’ पसरवायचं मीडियाचं काम त्यातल्या त्यात जास्त लोकांपर्यंत पोहोचतं, हे मॅडमनी अगदी हसत हसत सांगितलं.


दरम्यान, न्यूज १८ लोकमतवर विलास बडे यांचा ‘बडे मुद्दे’ शो प्रेक्षकांना ८ वाजता खिळवतोय. आता प्रश्न असा उठतो, सरिता मॅडम झिरो अवरमधून बाहेर पडल्यावर ‘बडे मुद्दे’ला कोणाची स्पर्धा राहणार? टीआरपीच्या शर्यतीत बडे मुद्दे आता कोणाला मुद्दा बनवणार? टीआरपीच्या गेममध्ये, शोचे ‘बडे मुद्दे’ बनवणार की आणखी कोणाला मुद्द्यावर चिरडणार? हाच आहे महाराष्ट्राच्या मीडियातला खराखुरा बडे प्रश्न!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या