न्यूज 18 लोकमत मध्ये "फणस" दरवळताच पाटलांचा राजीनामा !



मुंबई : फणस हा महाराष्ट्रात फक्त फळ नसून आता तो न्यूज 18 लोकमतच्या संपादक बदलण्याचं प्रतीक बनला आहे. तिसऱ्यांदा फणस (आमच्या म्हणजे मंदार फणसे यांचेच नाव आहे!) चॅनलमध्ये जॉईन झाल्यानंतर अखेर संपादक आशुतोष पाटील यांना 'फणसाचा वास' सहन न झाल्यामुळे राजीनामा द्यावा लागला.


गेल्या साडेचार वर्षात पाटील यांनी चॅनलला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण, २ सप्टेंबर रोजी मंदार फणसे यांनी दरवाजातून पाय आत टाकताच पाटील यांनी 'संपादकपद सोडण्याचा' निर्णय घेतला. आमच्या बातमीदारांनुसार, फणसांच्या तिसऱ्या आगमनाने वातावरण इतकं दरवळ की संपादकपदाच्या खुर्चीला पाटील यांनी अलविदा केलं.


न्यूज 18 लोकमत हे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीचं चॅनल आहे. लक्ष्मी इथे मुक्कामी असली तरी सरस्वती मात्र बराच काळापासून रुसलेली आहे. टीआरपीमध्ये पाचवा क्रमांक पटकावलेलं हे चॅनल, आता टीआरपीला नव्या फणसाच्या वासाने कसं खेचणार हे बघण्याची उत्सुकता आहे.


चॅनलमध्ये दर दोन-तीन वर्षांनी संपादक बदलणं ही आता परंपरा झाली आहे. कोरोनामुळे आशुतोष पाटील यांना 'मुदतवाढ' मिळाली होती, पण कोरोना गेला आणि पाटील हेसुद्धा गेले.


तिसऱ्या इनिंगसाठी मंदार फणसे या नव्या संपादकाला पुन्हा आमंत्रण मिळालं आहे. वृत्तसंपादक, कार्यकारी संपादक, आणि आता तिसऱ्यांदा संपादक म्हणून त्यांनी "फणसाला" एक नवीन सुगंध दिला आहे.


बघूया, या नवीन फणसाच्या आगमनाने न्यूज 18 लोकमत चॅनलला कुठपर्यंत पोहोचवतो आणि टीआरपीच्या पाचव्या क्रमांकावरून किमान तिसऱ्या स्थानी नेण्याचं स्वप्न फणस फुलवतो का!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या