महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक शांततेत पार पडल्याचं जाहीर होत असतानाच साताऱ्यात काही पत्रकारांनी मात्र "शांततेचा" अर्थ नव्याने लिहिला. निवडणूक कव्हरेजला आलेल्या एबीपी माझा आणि एनडीटीव्ही मराठी चॅनलच्या पत्रकारांनी मतदान केंद्राबाहेर "लाईव्ह शो" सुरू केला, पण विषय होता "हाणामारीचे प्रात्यक्षिक."
एकमेकांच्या "बाईट" हिसकावण्याच्या स्पर्धेत सुरू झालेला वाद थेट कुस्तीच्या रंगात बदलला. माईक जिवाच्या आकांताने थरथरत असतानाच कॅमेऱ्यांनी या ऐतिहासिक घटनाचं "फुल एचडी कव्हरेज" केलं. मात्र, गंमत म्हणजे या पत्रकारांच्या हाणामारीवरही एक व्यक्ती "जर्नलिस्ट ऑन जर्नलिस्ट अॅक्शन" चा लाईव्ह शूट करत होती.
तक्रारीचा विषय जुना असला तरी हा प्रकार नवा होता. पत्रकारांसाठी "स्ट्रिंगर" चा अर्थ आता केवळ बातमीपुरता नाही, तर अंगातली ताकद किती यावरही आधारित आहे, हे या घटनेने सिद्ध केलं आहे.
निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच "सातारा पत्रकार संघ" या घटनेला "डिव्हिजन लेव्हल राडा" चं नाव देऊन "बाईटच्या सुरक्षेसाठी" नवीन नियमावली तयार करणार असल्याचं जाहीर झालं आहे. आता बातमीची वाट लागते की बातमीवाल्यांची, हे पाहणं रंजक ठरणार आहे !
व्हिडीओ पाहा
0 टिप्पण्या