टीव्ही ९ मराठी पुन्हा एकदा टीआरपीच्या शिखरावर!

 



मुंबई: मराठी न्यूज चॅनेलच्या टीआरपीमध्ये टीव्ही ९ मराठीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आज जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार टीव्ही ९ मराठी २३.६ टक्के टीआरपीसह अव्वल स्थानावर आहे. न्यूज १८ लोकमत १८.४ टक्क्यांसह दुसऱ्या आणि एबीपी माझा १६.४ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

इतर चॅनेल्सची कामगिरी:

  • साम मराठीने १३.९ टक्के टीआरपी मिळवली आहे.
  • झी २४ तास १२.१ टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहे.
  • लोकशाही मराठी, पुढारी न्यूज, एनडी टीव्ही मराठी आणि जय महाराष्ट्र यांनी अनुक्रमे ५.६, ४.३, ३ आणि २.६ टक्के टीआरपी मिळवली आहे.

टीव्ही ९ मराठीने सातत्याने दर्जेदार बातम्या आणि विश्लेषणे देऊन प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यांच्या या कामगिरीचे हे फलित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या