दिव्य मराठीवर 'इन साईड स्टोरी'च्या नावाखाली खोटी बातमी छापल्याचा आरोप

 


परभणी: परभणी येथील एका अतिसंवेदनशील घटनेबाबत बातमी देताना दिव्य मराठी वृत्तपत्राने दि. १२ रोजी चुकीची माहिती प्रसिद्ध केल्याचा आरोप होत आहे. वृत्तपत्राने 'इन साईड स्टोरी' या सदराखाली आरोपी हिंदू समाज मोर्चाच्या सभेसाठी परभणीत आला होता असे लिहिले होते.

मात्र, या माहितीला कुठलाही आधार नसल्याचे निदर्शनास आले आहे. या चुकीच्या बातमीमुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे दिव्य मराठीला दि. १३ रोजीच्या अंकात खुलासा प्रसिद्ध करावा लागला आहे. त्यात आरोपीचा हिंदू समाज मोर्चाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

'इन साईड स्टोरी'च्या नावाखाली जातीय सलोखा बिघडवणारी ऐकीव माहिती छापून खुलासा करण्याची नामुष्की दिव्य मराठीवर आली आहे, अशी टीका होत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या