मुंबई - लोकशाही चॅनलमध्ये सध्या गोंधळाचा महोत्सव सुरू असून, हे गोंधळ 'इनपुट' पासून सुरू होऊन 'आउटपुट'पर्यंत पोहोचतो आहे. चॅनलमध्ये काम करण्यासाठी कोणीही तयार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
विशाल पाटील यांच्याकडे चॅनल व्यवस्थापनाची जबाबदारी असूनही, "तारे जमीन पर" सारखं व्यवस्थापन त्यांच्या हातातून घसरत असल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या मुलाखतींसाठी नेते चॅनलला चक्क हाय-हॅलोसुद्धा करत नाहीत, ज्यामुळे गणेश नायडू यांची नाराजी स्वाभाविकच वाढत चालली आहे.
तिकडे अँकर लाघवी ओम सावंत यांना अधूनमधून संपादक पदाचे गोड स्वप्न पडू लागले आहेत. "मीच योग्य संपादका !" असं त्यांच्या डोळ्यांमधून बोलून जातंय. अँकर असल्यामुळे विशाल पाटील यांना संपादकीय कौशल्य जमत नसल्याची कुजबुज चॅनलमध्ये सुरू आहे, तर काहींनी "मला संपादक बनवा नाहीतर रजेवर जातो!" अशा धमक्या दिल्याचंही ऐकू येत आहे.
लोकशाही चॅनलच्या 'गोंधळ' या लोकप्रिय सेगमेंटसाठी नवीन टॅगलाइन सुचवण्याची स्पर्धा लवकरच जाहीर होणार असून, विजेत्यास मोफत चहाचं आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे! “गोंधळ जिंका, गोंधळ बनवा” ही चॅनलची नव्या युगातील नवी घोषणा म्हणायला हरकत नाही!
0 टिप्पण्या