मुंबई - लोकशाही न्यूज चॅनलमध्ये विशाल पाटील हे नाव संपादक म्हणून फक्त हजेरीत आहे , पण सध्या खरी सत्ता आहे ती टी-18 फेम कामचोर अजिंक्य भातांब्रेकर आणि त्यांच्या सहकारी लाघवी सावंत यांच्या हाती. "लोकशाही"त सध्या "भातांब्रेकरशाही"चा बोलबाला असून चॅनलचे अँकर्स हतबल, रिपोर्टर कन्फ्यूज, आणि मालक वैतागले आहेत.
भातांब्रेकरांच्या 'काम'गिरीचा पराक्रम
अजिंक्य भातांब्रेकर यांना आऊटपुटची जबाबदारी मिळाली खरी, पण रनडाऊनवर बसण्याचे काम त्यांना "भातात"च राहिले आहे. दिवसभर कामच न करता चर्चांच्या घमासानात दिवस ढकलणे आणि रात्री नाटकी गायब होणे, ही त्यांची ठरलेली दिनचर्या. त्यांचे हे "स्वप्नवत" नेतृत्व पाहून इतर अँकर्स च्या डोळ्यात पाणी आणि हातात राजीनाम्याचे अर्ज दिसू लागले आहेत.
सावंतबाईंचा 'विक-ऑफ' मंत्र
लाघवी सावंत यांच्या 'गुड बुक्स'मध्ये असलेल्या अँकर्सना प्राइम टाईमचा फायदा मिळतो, पण "अनफेवरेट्स"ला सकाळी 6 पासून रात्रीपर्यंतची कसरत! अँकर्स आजारी असोत, सुट्टीवर असोत, की कामाला कंटाळले असोत—त्यांना जबरदस्ती कामावर आणले जाते. पण सावंतबाईंच्या गणपती आणि दिवाळीच्या सुट्ट्या मात्र "फिक्स" असतात.
विशाल पाटील: संपादक की नुसता दर्शक?
विशाल पाटील यांच्या नावाला शोभेल असे काहीच त्यांच्या कामगिरीत दिसत नाही. त्यांचे मुख्य काम आहे, कॉन्फरन्स रूममधील चर्चांना झळकणे आणि स्वतःच्या शोचे रनडाऊन बघणे. न्यूज रूममध्ये संपादकाचा शुकशुकाट असताना "कॉन्फरन्स रूम न्यूज चॅनल चालवतंय" अशी अवस्था निर्माण झाली आहे.
मालक गणेश नायडूंचा वैताग
गणेश नायडू हे या "भातांब्रेकरशाही"च्या बळकटीमुळे त्रस्त झाले आहेत. अँकर्स नी तक्रारी केल्या तरी विशाल पाटील उडवा-उडवीचे उत्तर देतात, आणि भातांब्रेकर यांचे "मी बऱ्याच वेळा काम करतो" हे अश्रू ढाळणारे विधान सगळ्यांना हास्यास्पद वाटते.
"काम करा नाहीतर जय महाराष्ट्र करा!"
या गोंधळात दोन एंकर्सनी थेट राजीनामा दिला, तर आणखी दोन "मी तुमच्याशी संपर्कात राहीन" म्हणत बाहेर काम शोधत आहेत. "लोकशाहीमध्ये पाटीलकी नाही, पण भातांब्रेकरशाही मात्र जोमात आहे," अशी चर्चा न्यूज रूमच्या चहाच्या कपांवर रंगली आहे.
लोकशाही न्यूज चॅनलच्या "नाट्यपूर्ण" स्थितीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पाहुया, भातांब्रेकरशाहीला आव्हान देणारा कोणता नवा "नायक" येतो ते!
0 टिप्पण्या