लोकशाही : विशाल पाटील यांच्या "न्यूज प्लॅनेट"वर गडबड गोंधळाचा गडगडाट!



मुंबई - लोकशाही चॅनलमध्ये विशाल पाटील यांनी मॅनेजिंग एडिटर म्हणून कार्यभार सांभाळल्यापासून चॅनलमध्ये एंकर्सची गळती सुरू असून, अलीकडेच अजून एका एंकरने “लोकशाहीचा आदर” ठेवत "जय महाराष्ट्र" म्हणत राजीनामा दिला आणि थेट News 18 लोकमतमध्ये उडी घेतली.

भातांब्रेकरशाहीची अफलातून करामत

सावंत बाई आणि भातांब्रेकरशाही समोर विशाल पाटील यांनी डाळ काही शिकत नाही.विशाल पाटील यांचा प्रयत्न 'सर्व सामावून घेणाऱ्या व्यवस्थे'कडे असला तरी भातांब्रेकरशाहीचे जनक मात्र या व्यवस्थेवर अजिबात भार टाकत नाहीत. ऑफिसमध्ये कोण पंचिंग करतो, कोण नाही याची विशेष चौकशी करणाऱ्या पाटील साहेबांना, भातांब्रेकरशाहीचे प्रतिनिधी पंचिंग न करताच ये-जा करतात, हे दिसत नाही. परिणामी, ऑफिसमधील नाराजीचा पारा चांगलाच चढला आहे.

‘न्यूज प्लॅनेट’चे ‘रंग’ उडाले

पाटील साहेबांचा 'न्यूज प्लॅनेट' शो म्हणजे एबीपीच्या शोचा कॉन्सेप्ट, न्यूज १८ लोकमतचा निळा रंग, आणि कुठूनतरी चोरलेल्या कल्पनांचे विलक्षण मिश्रण आहे. दिवसभर लाल रंगाने झळकणाऱ्या लोकशाहीमध्ये रात्री निळ्या रंगाची झलक देऊन काय साधले जाते, हे कळायला मार्ग नाही.

पीए कम प्रोड्यूसर: नाव मोठं, काम शून्य

विशाल पाटील यांनी आपल्या शोसाठी खास नेमलेला "पीए कम न्यूज प्लॅनेट प्रोड्यूसर" हा व्यक्ती चॅनलमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे काम म्हणजे कागदपत्रे कॉपी-पेस्ट करणे आणि कधीमधी ऑफिसमध्ये दर्शन देणे. शो संपल्यावर आउटपुट टीमला कोणतीच मदत नसल्यामुळे त्याच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी रूममध्ये खलबतं रंगली आहेत.

टीआरपी घसरतोय, गणेश नायडू यांच्या  कानावर नाही

विशाल पाटील यांचा शो आणि टीआरपी दोन्ही रसातळाला चालले असून, त्यावर चर्चा करण्याची हिंमत कोणाला होत नाही. सध्या गणेश नायडू यांना या सगळ्याची खबर नाही, तोपर्यंत चॅनलमध्ये सर्वकाही ‘आलबेल’ असल्याचे नाटक सुरू आहे.

विशाल पाटील यांचे शो निळ्या रंगाचे असले तरी ऑफिसमधील एंकर्सचा चेहरा मात्र फिक्कट होत चालला आहे. लोकशाहीचॅनलला  अनेकांनी जय महाराष्ट्र केला तरी प्रश्न आहे - “पाटील साहेब, तुम्ही कोणाचा जय करणार?"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या