धाराशिवचे रिपोर्टर एनडीटीव्ही मराठीमध्ये तात्पुरतेच का?

 


धाराशिव: एनडीटीव्ही मराठी चॅनल सुरू होऊन ९ महिने झाले, पण धाराशिवच्या रिपोर्टरना टिकवण्याचा काळ जेमतेम तीन महिन्यांचाच असल्याचा अनुभव येत आहे. धाराशिवच्या पत्रकारांसाठी हा चॅनल ‘ये जा, जा रे पाखरा’ असा झाला आहे.

सुरुवातीला अझर शेख:

धाराशिवमधून सुरुवातीला अझर शेखला संधी देण्यात आली. पत्रकारितेत काही तरी करू पाहणाऱ्या अझरला तीन महिन्यांनी चॅनलने निरोप दिला. नंतर आलेल्या संगीता काळे यांचा अनुभव तर अधिकच छोटा – केवळ एका महिन्यातच त्यांना काढून टाकण्यात आले.

अर्जुन गोडगेचं दु:ख:

धाराशिवच्या अर्जुन गोडगेने चॅनलसाठी जीव तोडून मेहनत केली. नवीन मोबाईलसाठी कर्ज घेऊन बातम्यांचा पाठपुरावा केला, पण त्यालाही एका महिन्यात बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याच्या मेहनतीला मिळालेला हा ‘पुरस्कार’ धाराशिवच्या पत्रकारांमध्ये चर्चा विषय बनला आहे.

ओंकार कुलकर्णीला किती दिवस?

आता धाराशिवमधून ओंकार कुलकर्णी यांनी एनडीटीव्ही मराठीमध्ये प्रवेश केला आहे. लोकशाही चॅनलमधील स्थिरतेला मागे सोडून आलेल्या ओंकारची वाटचाल आता किती दिवस टिकेल, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. धाराशिवच्या प्रतिनिधींसाठी तीन महिन्यांचा ‘नियम’ कायम राहणार की चॅनलला स्थिरता मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

धाराशिवमध्ये नाराजीचा सूर:

पत्रकार टिकवण्यात चॅनलला अपयश येत असल्याने धाराशिवच्या माध्यम वर्तुळात नाराजीचा सूर आहे. “बाहेरून चकाचक दिसणाऱ्या चॅनलला स्थानिक पत्रकारांचा आदर टिकवता आला पाहिजे,” अशी भावना पत्रकारांकडून व्यक्त केली जात आहे.

आता ओंकार कुलकर्णी किती दिवस टिकतात, हा प्रश्न धाराशिवकरांना सतावत आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या