मुंबई - एनडी टीव्ही मराठी चॅनलने सुरुवातीच्या नऊ महिन्यांतच टीआरपीच्या आखाड्यात आपला "मागील बाकावरचा विद्यार्थी" हा बहुमान टिकवला आहे. चॅनलच्या अंतर्गत घडामोडी वाचून वाटते की हे चॅनल "कोणाचे कुणाशी मिळत नाही" या घोषवाक्यासाठीच स्थापन झाले असावे.
चॅनलच्या कर्मचाऱ्यांचा "जाणता राजा" म्हणून उल्लेख करणे योग्य ठरेल, कारण इथे प्रत्येकजण स्वतःला चॅनलचा राजा समजतो. या राजांचा मुख्य उद्योग म्हणजे इतरांना कमी लेखणे आणि टीआरपीचे स्वप्न पाहणे.
स्ट्रिंगर रिपोर्टर म्हणजे उपाशीपोटी शूरवीर!
प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त केलेल्या स्ट्रिंगर रिपोर्टर लोकांना चॅनलने काही मजेदार नियम दिले आहेत. स्वतःचे युट्युब चॅनल बंद करा, दुसऱ्या चॅनलसाठी काम करू नका – म्हणजे "स्वावलंबनाचे" नवे मॉडेल! मात्र, पुण्याचा आर. के. नावाचा ब्युरो या नियमांना हरभऱ्याच्या झाडावर बसवून स्वतःचे युट्युब चॅनल अगदी थाटात चालवत आहे. विशेष म्हणजे, त्याच्या चॅनलवर एनडी टीव्ही मराठीचा बूमही झळकत असतो, तरीही वरिष्ठ त्याच्याकडे "चिळ" देखील करत नाहीत. त्यामुळे इतर स्ट्रिंगर स्वतःच्या दुर्दशेवर हसावं की रडावं, हे ठरवू शकलेले नाहीत.
‘ये तो आए, देखा और गया!’
स्ट्रिंगर रिपोर्टर लोकांचा चॅनलवरील कार्यकाल हा "तीन ते सहा महिने" एवढाच आहे. कारण? काम जास्त, पगार कमी – हे समीकरण कोणालाही पचणारे नाही. त्यामुळे हे चॅनल "येणार, बघणार, निघणार" यासाठीच ओळखले जाते.
टीआरपी कधी मिळणार?
चॅनलच्या या अनागोंदी कारभारामुळे टीआरपीवर परिणाम होतोय की टीआरपीमुळे कारभार असा होतोय, याचा शोध घेतल्याशिवाय प्रेक्षकांना याचे गणित कळणार नाही. मात्र एक मात्र नक्की – टीआरपीच्या शर्यतीत एनडी टीव्ही मराठी मागेच राहणार, असा अंदाज चॅनलच्या चाहत्यांनी (म्हणजे कर्मचाऱ्यांनी) आधीच बांधला आहे!
बिग बजेटचा बिग फ्लॉप: एनडीटीव्ही मराठीचे ‘टीआरपी’ तमाशा!
मुंबई: गौतम अडानी यांच्या मालकीचा भारी चॅनल, भारी तंत्रज्ञान, आणि भारी स्टुडिओ असलेला एनडीटीव्ही मराठी सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे – टीआरपीच्या खालच्या पायऱ्यांवर बसण्यासाठी! सुरू होऊन नऊ महिने झाले तरी चॅनलला प्रेक्षकांचं ‘भारी’ प्रेम मिळत नाहीये. टीआरपी फक्त २.५! म्हणजे चक्क ९ नंबरवर स्थान!
बातम्यांची बोंबाबोंब!
सुरुवातीला चॅनलने स्वतःला ‘ग्रेट’ समजणारे भारी लोक भरती करून घेतले. पण हा बिग बजेटचा पिक्चर चक्क फ्लॉप ठरला. प्रेक्षकांनी त्यांना किमान टीआरपी तरी ‘दान’ करावा, अशी चॅनलची अपेक्षा होती. मात्र, प्रेक्षकांनी सरळ दुर्लक्ष करत त्यांचा प्लॉट उघड केला.
बिग बजेट चॅनल आणि छोटा टीआरपी:
प्रेक्षकांना भारी स्टुडिओपेक्षा भारी बातम्या आणि मुद्देसूद पत्रकारिता हवी आहे, हे चॅनलच्या व्यवस्थापनाला कधी कळणार? की अजून नवे ‘स्टेजर’ शोधून टीआरपीची चढाओढ सुरूच राहणार?
म्हणजे काय, टीआरपीचा बॉंब फुटलाय, पण तो वाजायला प्रेक्षकच हवे ना!
0 टिप्पण्या