मुंबई - "पैशांत वजन असतं" या म्हणीला आता नवीन अर्थ आला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीचं 'न्यूज 18 लोकमत' चॅनल टीआरपीच्या रणांगणात पहिल्यांदाच नंबर १ झालं आहे. टीव्ही ९ मराठीचं दीर्घकाळ टिकलेलं गादीसिंहासन आता हललं असून अंबानींच्या लॅडींग पेजेसनी टीआरपीचा रथ सरळ 'नंबर वन'च्या मुक्कामी नेला आहे.
लॅडींग पेजेसचा जादूई चिमटा!
'न्यूज 18 लोकमत'ने टीआरपी मिळवण्यासाठी काही करोडो रुपये खर्च करून लॅडींग पेजेस विकत घेतल्याची चर्चा आहे. बेरक्याने याचं भाकीत आधीच केलं होतं की "हे चॅनल नंबर १ होईल," आणि बेरक्याच्या तोंडाला लावायचा पेढा अंबानींनी टीआरपीनेच पाठवला!
पैसे अन् टीआरपीची अफलातून केमिस्ट्री
मुकेश अंबानींच्या जवळ पैशांची कमी नाही, पण सरस्वती मागच्या बाकावर म्हणजे चक्क पाचव्या स्थानावर बसली होती. २ सप्टेंबर २०२३ रोजी आशुतोष पाटील यांच्या जागेवर मंदार फणसे यांनी संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि काही महिनेचं गणित लॅडींग पेजेसच्या सहकार्याने मांडलं गेलं. आता, 'न्यूज 18 लोकमत' टीआरपी चार्टवर 21.9 गुणांसह ऐटीत विराजमान झालं आहे. मागे उरलेला टीव्ही ९ मराठी (21.3) आता 'केवळ 0.6 गुणांमुळे' दुसऱ्या क्रमांकावर ढकललं गेलं आहे.
टीआरपीच्या थरारक टेबलावर हजेरी:
न्यूज 18 लोकमत : 21.9
TV 9 मराठी: 21.3
ABP माझा: 16.8
साम: 13.9
झी 24 तास: 11.9
टीआरपीचे गणित अन् 'सरस्वती'ची पुनःप्रतिष्ठा
हा सगळा चमत्कार लॅडींग पेजेसचा की टीआरपीचा? "पैशांचं काय चुकतं का?" हा प्रश्न मात्र आता प्रत्येकाच्या मनात आहे. सरस्वती आणि लक्ष्मीचं एकत्र येणं म्हणजे 'न्यूज 18 लोकमत'चा हा मोठा विजय म्हणायला हरकत नाही.
तसं पाहता, टीआरपीच्या लढाईत बाकी चॅनेल्स आता आपापल्या लॅडींग पेजेसची व्यवस्था बघत आहेत. बेरक्याचं एक वाक्य इथे चपखल लागू पडतं - "टीआरपी ही खेळाची नवी मैदानं झाली आहेत, तिथं जिंकण्यासाठी नव्या ट्रिक्स लागतात!"
0 टिप्पण्या