"डिबेट"च्या नावाखाली "दंगल" घडवणारा वादग्रस्त कार्यक्रम!
न्यूज 18 लोकमतवर दररोज रात्री 8 वाजता विलास बडे यांचा चर्चासत्राचा कार्यक्रम "बडे मुद्दे" होतो. पण हा कार्यक्रम नेमका "मुद्द्यांवर" असतो की "वादांवर" यावरच वाद सुरु आहेत. कारण कधी मुद्देच मिळत नाहीत, कधी पाहुणे मिळत नाहीत, आणि मिळालेच तर एकदाच मिळतात!
मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या पाहुण्या होत्या आणि मग काय, हा शो डिबेटपेक्षा WWE मॅचसारखा दिसू लागला!
सरपंच हत्या, ट्विटचा स्फोट आणि आरोपांचा भडिमार
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या महिन्याभरात गाजत आहे. पोलीस तपास सुरू असला तरी गुन्ह्याच्या फाईलीत राजकीय भूकंप घडवणारे नावे गोवली जात आहेत. यात थेट मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेतले जात असून, त्यांच्या जवळच्या वाल्मिक कराड यांना आधीच जेलमध्ये पाठवले आहे.
याच मुद्द्यावर चर्चेसाठी अंजली दमानिया उपस्थित होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी "हत्येतील तीन आरोपींची हत्या झाली" असे एक ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. मात्र हा दावा खोटा ठरला!
याच मुद्द्यावर बडे यांनी "खोटं ट्विट का केलं?" असा सवाल टाकला, आणि मग डिबेट एकदम भडकलं!
बडे विरुद्ध दमानिया : आरोपांची बडी फैज
बडे सरांनी दमानियांना खोट्या माहितीवरून "सनसनाटी ट्विट का केलं?" अशी विचारणा केली. पण मग काय, दमानिया मॅडमने पलटवार करताच स्टुडिओतच वादळ उठलं!
त्यांनी बडेंनाच "सनसनाटी पत्रकार" म्हणायला सुरुवात केली. "न्यूज 18 लोकमत हे चक्क सनसनाटी बातम्या पेरतं" असा आरोप केला. त्यावर बडेंनी त्यांना "शल्य चिकित्सक थोरात यांच्यावर आरोप करताय, तुमच्याकडे पुरावे आहेत का?" असे विचारताच दमानिया मॅडम अक्षरशः तापल्या!
त्या एवढ्या भडकल्या की, स्टुडिओतच बडेंवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. बडे सर अडचणीत सापडल्यावर प्रयत्नपूर्वक आपली बाजू मांडू लागले. पण शेवटी दमानिया मॅडम रडकुंडीला आल्या !
हा राडा तब्बल २० मिनिटे सुरू होता. डिबेट कमी आणि वादाचा जंगी सामना अधिक सुरू होता.
व्हिडीओ गायब, पण बेरक्याने केला "बडा" खुलासा!
इतका गोंधळ झाल्यावर न्यूज 18 लोकमतवाल्यांनी पटकन व्हिडीओ गायब केला! पण सोशल मीडियावर काय हरकत नाही…
बेरक्याने तो व्हिडीओ प्रसिद्ध केला आणि मग काय, कमेंट्सचा महापूर आला!
- कुणी बडेंना जातीयवादी पत्रकार ठरवलं
- कुणी दमानियांना सुपारीबाज म्हटलं
आता बडे मुद्दे हे मुद्द्यांसाठी चर्चेत आहेत की वादांसाठी? असा प्रश्न उपस्थित होतो.
व्हिडीओ पाहा
पुढील भागात… पाहुणे मिळतील का? की मुद्देच संपले?
आता प्रश्न असा आहे की, पुढच्या भागात बडे सरांना पाहुणे मिळतील का? की आता बडे मुद्दे फक्त "बडे वाद" निर्माण करण्यापुरतेच उरतील?
न्यूज 18 लोकमतवर काय घडतंय हे पाहायला तुम्ही तयार आहात का? कमेंटमध्ये तुमचं मत नोंदवा!
0 टिप्पण्या