अकोल्यात सध्या एक भन्नाट प्रकरण गाजतंय! बातम्या चोरण्याच्या आरोपांपेक्षा इथे "बातमीदार" च जरा जास्त रंगात आले आहेत. News 18 लोकमतचा धडाडीचा (?) पत्रकार कुंदन जाधव याने दारूच्या नशेत थेट जय महाराष्ट्र चॅनलच्या रिपोर्टर वर्षा मोरे यांना कॉल करून तुफान शिव्यांचा वर्षाव केल्याचं उघड झालंय.
"ही बातमी माझीच!"
देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आणि जय महाराष्ट्र चॅनलने प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया दाखवली. जिल्हा प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी ती बातमी लिंक आमदार अमोल मिटकरी यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली. पण इथेच खेळ बिघडला!
दारूच्या नशेत सदैव झिंगलेला कुंदन जाधव अचानकच वर्षा मोरे यांच्यावर तुटून पडला – "ही बातमी माझी आहे, चोरली का?" असा थेट आरोप केला. पण वर्षा मोरे यांनी शांत न बसता थेट पुरावेच समोर आणले! त्यांनी स्वतःच ती बातमी रेकॉर्ड केल्याचे सिद्ध केले आणि कुंदनचा "चोरीचा आरोप" फुसका बार ठरला.
दारूचा नशेत ‘महिला पत्रकारां’ना शिव्या
अपयश पचवता न आल्याने कुंदनने पुढे आणखी एक करामत केली – तो वर्षा मोरे यांना "दारुड्या" म्हणू लागला. पण हा नशेबाज कदाचित विसरला की, पत्रकारितेत महिलाही तितक्याच लढवय्या असतात!
त्यांनी थेट ग्रुपवरच कुंदनची संपूर्ण चित्तरकथा उघड केली – दारू प्यायल्यानंतर हा इसम काय काय उद्योग करतो? कोणाला किती शिव्या घालतो? किती ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या आहेत? सगळं काही उघड झालं.
"दोन पेग जास्त झाले की, फोन सुरू!"
कुंदन जाधवची ही पहिली वेळ नाही. आधीही तो अनेक पत्रकारांना रात्री अपरात्री फोन करून शिव्या घालत होता. का? तर त्याच्या ऑफिसकडून दबाव यायचा – "बातमी मिळाली नाही तर तुझी खैर नाही!" मग काय, चॅनलकडून मिळालेला तणाव तो इतर पत्रकारांवर काढायचा. दारू प्यायची, फोन उचलायचा, आणि शिव्या घालायच्या!
वर्षा मोरे थेट पोलिस ठाण्यात!
या प्रकरणावर वर्षा मोरे यांनी थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत स्पष्ट नमूद आहे – "या व्यक्तीचा महिलांबद्दलचा अपमानकारक वर्तन अवाच्या सवा वाढलाय. पत्रकारितेच्या नावाखाली तो दारू पिऊन महिलांना शिव्या घालतो, बदनाम करतो!"
News 18 लोकमतच्या संपादकांचे आश्वासन
हे प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही, तर थेट News 18 लोकमतच्या ऑफिसमध्येही पोहोचलं. संपादक मंदार फणसे यांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करू, असं स्पष्ट सांगितलं.
"दारूने घात केला, आता जागा हो!"
पत्रकारितेत टॅलेंटपेक्षा "टॅली" जास्त घेणाऱ्या काही जणांना ही घटना जागं करण्यासाठी पुरेशी ठरेल. बातमी चोरल्याचा आरोप करताना स्वतःची विश्वासार्हता हरवणाऱ्या या स्वयंघोषित पत्रकाराने आता खरा "ब्रेकिंग न्यूज" घडवली आहे – ती म्हणजे "दारूच्या नशेत स्वतःच्याच करिअरची वाताहत"
0 टिप्पण्या