बातम्यांचा लढवय्या आणि डिजिटल डावपेचांचा बळी!


एका पत्रकाराने नवशक्ती पेपरच्या  यूट्यूब चॅनेलला अवघ्या नऊ महिन्यांत झपाट्याने वाढवले. सुरूवातीला फक्त १०२०२ सबस्क्रायबर्स असलेला चॅनेल थेट ५१,५०० च्या वर गेला. हा प्रवास एका माणसाच्या जिद्दीचा, मेहनतीचा आणि निष्ठेचा होता. कोणताही ठोस बातमी स्रोत नसताना, आपल्या संवेदनशीलतेने आणि कौशल्याने बातम्या पडताळून पब्लिश करायच्या, हे सोपे काम नव्हते. पण हेच धाडस त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरले.

बातम्यांचे ‘राजकारण’ आणि खेळलेल्या डावपेचांमुळे विकेट!

सहा जानेवारीला एक नवीन पात्र चॅनेलमध्ये आले –रिटायर्ड ! ही पत्रकारिता करण्यासाठी नव्हे, तर राजकारण करण्यात माहिर होती. बातम्या लिहिता येत नसल्या तरी ऑफिसमध्ये राजकीय डावपेच खेळण्यात तिचा हातखंडा होता. HR प्राची सिंग यांच्याशी बोलून, नऊ महिन्यांपासून अथक परिश्रम करणाऱ्या पत्रकाराची विकेट तिने घेतली.

हीच रिटायर्ड  काही महिन्यांपूर्वी न्यूज १८ लोकमतमधून बाहेर काढली गेली होती. कारण? तिच्या कामाचं अपयश! मग ती लोकशाही न्यूजमध्ये कामाला गेली आणि ३१ जानेवारीला तिथेही तिचा शेवटचा दिवस होता. पण या सगळ्या प्रवासात ती एक गोष्ट नक्की शिकली – पोलिटिक्स!

‘कोण बोलतो, त्याचा आवाज कोण ऐकतो’ – हा गेम!

हीच रिटायर्ड  नवशक्तीत आली आणि लगेचच ऑफिसमध्ये राजकारणाला सुरुवात झाली. बातमीची ABC माहित नसलेल्या या मुलीच्या प्रभावाखाली चॅनेलचा कारभार गेला आणि खऱ्या मेहनतीच्या पत्रकाराला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

हा खेळ एकट्या रिटायर्ड ने खेळला नाही. तिला साथ होती – HR आणि काही ‘गोलंदाजांच्या’! न्यूज १८ लोकमतचा ग्राफिक्स डिपार्टमेंटमधला आशिक , हा रिटायर्डचा   खास माणूस! त्याचं मुख्य काम? रिटायर्डला ऑफिसला आणायचं आणि सोडायचं! म्हणजे पत्रकारितेचा नवा नियम – बातम्या कमी, उठबस जास्त!

डिजिटल विभागातील ‘मौजमस्ती’ आणि ‘वाट लागलेला कारभार’

नवशक्तीच्या डिजिटल विभागात मराठीचा हेडच नाही! त्यामुळे "मी बोलीन ती पूर्व दिशा" हा कारभार सुरू आहे. मराठीसाठी कोण लक्ष घालणार? एक इंग्रजीचा ‘बुद्धू’ असलेला असीम श्रीवास्तव! त्याला मराठी कळत नाही, पण यूट्यूब चॅनेल सांभाळायचं जबाबदारी दिली आहे.

मराठी वेबसाईट सांभाळणारा सागर शिरसाट? त्याचा ऑफिसला येण्याचा एकमेव उद्देश – "आठ तास भरायचे आणि घरी जायचं!" कोणालाच काही समजत नाही, म्हणून हा माणूस काहीही न करता पगार घेतोय. मात्र एकटा प्रणव कांबळे मेहनत करताना दिसतो, पण त्यालाही या गलिच्छ व्यवस्थेचा कंटाळा आला आहे.

 असा सगळा ‘डिजिटल तमाशा’ किती दिवस चालणार?

खऱ्या मेहनतीच्या पत्रकारांची विकेट काढली जाते आणि राजकारण करणाऱ्यांना राजसिंहासन दिलं जातं. याला पत्रकारिता म्हणायचं की सत्तेचा खेळ?

"बातम्या म्हणजे सत्याचा शोध!" पण इथे सत्याला गाडून, राजकीय नाती आणि ऑफिस राजकारण जिंकत आहे. प्रश्न असा आहे – ही पत्रकारिता कुणाच्या हातात गेली आहे?


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या