"उघडा डोळे" चॅनलला चष्मा लावण्याची गरज?

 


मुंबई । कधी काळी 17 पैकी 14 वर्षे नंबर 1 राहिलेल्या "उघडा डोळे, बघा नीट" चॅनलचे डोळे आता पाणावले आहेत! गेल्या तीन वर्षांपासून हा चॅनल तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्यामुळे आता चॅनलच्या ऑफिसमध्ये गंभीर चर्चा कमी आणि सुस्कारे जास्त ऐकू येत आहेत.

सध्याच्या परिस्थितीला कंटाळून चक्क सहा जणांनी राजीनामा दिला आहे. कारण काय? तर "भारत माता"!  ही भारत माता कधीच समाधानी राहत नाही. तुम्ही कितीही मेहनत केली, तरी तिचं एकच उत्तर - "तुझ्या कामावर समाधान नाही!"

दरम्यान , झिरो अवर मॅडम या गोंधळात "समजूत घालण्याचा" कार्यक्रम घेऊन बसल्या आहेत. पण लोक आता समजून घेण्याच्या मूडमध्ये नाहीत!

स्पर्धा चुरशीची, पण साधनसंपत्तीचे काय?

ही परिस्थिती येण्याचं मुख्य कारण म्हणजे टीव्ही 9 शी होणारी स्पर्धा. टीव्ही 9 एका मोठ्या इव्हेंटसाठी 8 ते 9 रिपोर्टर पाठवतं, तर "उघडा डोळे" चॅनल फक्त 2 रिपोर्टर पाठवतो. आता मैदानात संघच कमी असेल, तर सामना कसा जिंकणार?

टीव्ही 9 चे रिपोर्टर इव्हेंटच्या प्रत्येक कोपऱ्यात उभे राहून ब्रेकिंग न्यूज देतात, तर "उघडा डोळे"चे दोन रिपोर्टर एकाच ठिकाणी उभे राहून "आम्ही दोघं, आमच्या बातम्या दोघंच!" म्हणत हात चोळत राहतात.

चष्मा बदला, गेम बदला!

स्पर्धा जिंकायची असेल, तर "उघडा डोळे"वाल्यांनी डोळे उघडून नीट बघायला सुरुवात करावी लागेल. नाहीतर "भारत माता" पुन्हा एकदा तेच बोलेल – "तुझ्या कामावर समाधान नाही!"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या