पत्रकारांसाठी लढणाऱ्या संघटनेचं अध्यक्षपद म्हणजे एका जबाबदारीचं प्रतीक असायला हवं. पण इथे ‘पत्रकारांचा आवाज’ नावाची संघटना स्वतःच पत्रकारितेच्या मूल्यांवर गदा आणत आहे!
स्वयंघोषित अध्यक्ष की स्वयंघोषित भामटा?
या संघटनेचा स्वयंघोषित अध्यक्ष आधी एका मोठ्या माध्यम संस्थेत कार्यरत होता. पण पत्रकारिता त्याला जमत नव्हती—चार ओळीही धड लिहिता यायच्या नाहीत! मग काय केलं? एका फिचर एजन्सीकडून लेख लिहून घेतले आणि स्वतःच्या नावावर खपवले!
हे महाशय माध्यम संस्थेच्या नावाखाली खासगी दौऱ्यांवर जायचे आणि नंतर संस्थेच्या अकाउंटला ‘बिल्डिंग’ उभारायचे—
✅ स्थानिक पत्रकाराकडून जेवण घेऊन त्याचं बिल संस्थेकडून वसूल करायचं.
✅ १०० किलोमीटर प्रवास केला तरी ३०० किलोमीटरचं खोटं बिल लावायचं.
✅ धाब्यावर जेवला तरी फाइव्ह स्टार हॉटेलचं बोगस बिल जोडायचं.
म्हणजे पत्रकारिता कमी, आणि घोटाळेबाजी जास्त!
भानगडी बाहेर आल्या आणि ढुंगणावर लाथ बसली!
ही भामटेगिरी संस्थेच्या मालकांच्या लक्षात आली आणि सहा महिन्यांपूर्वीच या महाशयांना बाहेरचा रस्ता दाखवला! आता स्थिती अशी आहे की, पत्रकारिता क्षेत्रात याला काळं कुत्रंही विचारत नाही!
पत्रकारांचा आवाज की फसवणुकीचा तंबू?
या महाशयांनी माध्यम संस्थेत असतानाच ‘पत्रकारांचा आवाज’ नावाची संघटना काढली होती. पण या संघटनेत खरं कोण होतं? प्रतिष्ठित दैनिकांचे कोणीही पत्रकार नव्हते! जे चार-दोन होते, तेही निघून गेले.
संघटनेत कोण आहेत?
या संघटनेत आता कोण आहेत, हे पाहूनच हसू येईल—
➡️ अधूनमधून साप्ताहिक काढणारे – म्हणजे महिन्यातून एकदा तरी कागदावर नाव छापलं जातं, म्हणून स्वतःला पत्रकार म्हणणारे.
➡️ यूट्यूब चॅनेलवाले – ज्या चॅनेलचे सबस्क्रायबर एक ते दोन हजाराच्या पुढे गेले नाहीत, पण तरीही हे स्वतःला ‘राष्ट्रीय पत्रकार’ समजतात!
➡️ दोन नंबरचे धंदे करणारे – यात हप्ते वसूल करणारे, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत.
➡️ बार मालक – संघटनेचा प्रमुख आधारस्तंभ!
संघटना की स्वतःचं पीआर मशीन?
ही संघटना आता पत्रकारांसाठी काम करतेय का ‘पत्रकारांचा मुखवटा घालून’ स्वतःचा फायदा करून घेतेय? आता तर पुरस्कारही विकायला काढलेत!
पत्रकारितेचं नाव घेतलं तरी संघटनांची विश्वासार्हता राहते. पण इथे ‘पत्रकार’ म्हणून नटून बसलेले लोक चक्क व्यावसायिक धंदे करायला लागले आहेत! हेच चालू राहिलं, तर खरे पत्रकार या सगळ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडले जातील!
0 टिप्पण्या