पत्रकारांचा आवाज की पैशाचा बाजार? – पार्ट ५


पत्रकार संघटना म्हणजे काय? पत्रकारितेचे रक्षण करणारी संस्था, की पत्रकारितेच्या नावाने स्वतःचा धंदा वाढवणारी टोळी? आता परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी पत्रकार संघटना म्हणजे धंदेवाईक टोळक्यांचे गठ्ठे झाले आहेत.

मराठवाड्यातील ‘संघटनेची’ गंमत!

मराठवाड्यात एका शहरातील पत्रकारांचा आवाज  संघटनेच्या कार्यकारिणीत काय दिसतं?
एक बार मालक – पत्रकारिता कोणत्या बाटलीत मिळतेय, कुणास ठाऊक!
एक दोन नंबर धंदे करणारा – वृत्तसंकलन सोडा, हा स्वतःच ‘ब्रेकिंग न्यूज’ आहे!
दोन हानाभाई अध्यक्ष! – काहीही अनुभव नाही, पण अध्यक्ष झाले!

चार ओळी लिहिता येत नाही, पण ‘मीडिया बिझनेस’ जोरात!

हे महाशय स्वतःला पत्रकार म्हणवतात, पण त्यांना चार ओळीसुद्धा धड लिहिता येत नाहीत. मग काय उपाय? त्यांनी युट्यूब चॅनलवर बातम्या लिहिण्यासाठी खास ‘माणूस’ ठेवला! म्हणजे पत्रकार नाही, पण पत्रकारितेचा ‘धंदा’ मस्त सुरू आहे.

पत्रकारिता की जबरदस्तीचा हप्ता?

यांचा मुख्य धंदा काय?
➤ कुणी कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन द्यायला आला, की लगेच टपकायचं.
➤ त्या बातमीसाठी ₹१,००० ते ₹२,००० उकळायचे.
➤ सात-आठ जण मिळून तो पैसा वाटून घ्यायचा.

म्हणजे बातमी नाही, तर बातमीला भाव लावून ‘डील’ करायचं!

जिल्ह्या-जिल्ह्यात टोळक्यांचा खेळ!

या संघटनेने आता प्रत्येक जिल्ह्यात अशीच ‘टिम’ तयार केली आहे. त्यामुळे पत्रकारिता ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ राहिली नाही, तर हप्ता गोळा करणाऱ्या टोळक्यांची ‘मीडिया कंपनी’ झाली आहे!

पत्रकारितेचा मोठा अपमान!

या सगळ्याचा परिणाम काय?
सत्य लपवले जाते, पैसेवाल्यांचीच बातमी होते.
खरे पत्रकार या धंदेवाईक टोळक्यांमुळे बदनाम होतात.
जनतेचा विश्वास पत्रकारितेवरून उडतो.

ही परिस्थिती बदलली नाही, तर लवकरच पत्रकारिता ‘धंदा’ नाही, तर ‘हट्टा’ म्हणून ओळखली जाईल!

– बेरक्या उर्फ नारद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या