मुंबई - लोकशाही चॅनलमध्ये सुरू असलेल्या गोंधळावर आता गळतीचा तडाखा बसला आहे. इनपुट हेड मिलिंद सागरे यांनी थेट 'झी 24 तास' मध्ये उडी घेत चॅनलला रामराम ठोकला आहे. त्यांच्या पाठोपाठ नवी मुंबईतील स्ट्रिंजर विकास मिररगणे यांनीही राजीनामा देत ‘लोकशाही’च्या बाहेरचा रस्ता धरला.
दरम्यान, विशाल पाटील यांनी मोठी कारवाई करत तब्बल 8 स्टिंगर्सना नारळ दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, नारळ देताना काही जणांनी ‘चॅनलमध्येच सगळे गोंधळलेत, मग आम्हाला का?' असा सवाल उपस्थित केला. मात्र, पाटील यांनी कोणालाही वेळ न देता नारळाचा प्रसाद वितरित केला.
गोंधळ, नाराजी, गळती आणि राजीनाम्यांचा सिलसिला पाहता लोकशाही चॅनलचं पुढचं पाऊल काय असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, गणेश नायडू यांच्या हालचालींवर सर्वांचं लक्ष असणार आहे. लाघवी सावंतच्या स्वप्नांमध्ये आता आणखी रंग भरले जाणार का? ‘लोकशाही’मध्ये पुढील पर्व गोंधळ 2.0 सुरू होतो की काय?
0 टिप्पण्या