तीन गंभीर गुन्ह्यांनी माहिती व जनसंपर्क खाते वादात

मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत, व्यंगचित्रकार प्रशांत आष्टीकर यांची मागणी




मुंबई - माहिती व जनसंपर्क खात्यात तीन मोठे गैरव्यवहार झाल्याचा आरोप प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत आष्टीकर यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना पत्र लिहून तातडीने चौकशीची मागणी केली आहे. आष्टीकर यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पहिला गुन्हा :  उच्च न्यायालयाने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेवर 2002 साली प्रशासक नेमले असताना, 2023 मध्ये एस. एम. देशमुख यांची 16 जणांची समिती शासनाने कशी काय जाहीर केली, असा प्रश्न आष्टीकर यांनी उपस्थित केला आहे. शासनाची 23 वर्षांपासून फसवणूक करणाऱ्या एस. एम. देशमुख आणि यदु जोशी यांना अद्याप अटक का झाली नाही, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

दुसरा गुन्हा : सुमारे दोनशे कोटींची संपत्ती असलेल्या पत्रकाराला शासनाने पत्रकार पेन्शन योजना लागू केली आहे. मनमाड येथील पत्रकार नरेश गुजराती यांना बेकायदेशीरपणे पेन्शन मंजूर करणारे पत्रकार पेन्शन योजनेचे अध्यक्ष राजा माने यांच्यावर कारवाई का झाली नाही, असा मुद्दा आष्टीकर यांनी उपस्थित केला आहे. नरेश गुजराती यांच्या घरात प्रत्येकाला अधिस्वीकृती कार्ड होते, याची नोंद शासनाच्या दप्तरी आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

तिसरा गुन्हा :  सातारा येथील पत्रकार हरीश पाटणे (पुढारी) यांनी नगरपालिकेच्या ग्रंथालयाची इमारत हडपण्याचा प्रयत्न चालवला आहे. रात्री या इमारतीत गैरकृत्ये चालू असूनही शासन गप्प का आहे, असा सवाल आष्टीकर यांनी विचारला आहे. माहिती व जनसंपर्क खात्याचे प्रभारी ब्रिजेश सिंह असून हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी आष्टीकर यांनी केली आहे.

आष्टीकर यांचा इशारा - 

 शासनाने या प्रकरणांवर कानाडोळा करू नये, असा इशारा आष्टीकर यांनी दिला आहे. माहिती आयुक्तपदी दिलीप धारूरकर यांची नियुक्ती झाली होती, त्यांची चौकशी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत, याची आठवण आष्टीकर यांनी करून दिली आहे.

या गंभीर आरोपांमुळे माहिती व जनसंपर्क खाते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या