टीव्ही नाईनचा आतल्या गोटातला चमत्कारिक शो!

 

मुंबई -  मराठी न्यूज चॅनलच्या यादीत कायम नंबर वन राहण्याचा बहुमान मिळवलेल्या टीव्ही नाईन मराठीने आता पत्रकारितेपेक्षा आतल्या राजकारणात अव्वल स्थान पटकावलंय! संपादक कुमावत आणि बिजनेस हेड यांच्यातलं गुह्य युद्ध मागच्या पाच वर्षांत एवढ्या शिगेला पोहोचलंय की, आता संपादकीय मीटिंगपेक्षा डावपेच आखायच्या मिटिंग्स जास्त सुरू असतात.

एक टीम जिवाचं रान करून मेहनत करणार आणि मार्केटिंगवाले मावा खात मजा करणार, हे कसं चालेल? असा मोठा प्रश्न तिथल्या कर्मचाऱ्यांना पडला असला तरी, शेवटी निर्णय त्यांच्या चमच्यांच्या गटातल्या काकासाहेबांचाच! टीव्ही नऊ नेहमीच राजकीय घडामोडी ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवत असला तरी, चॅनलमध्येच सुरू असलेल्या कुटिल राजकारणावर कोण दाखवणार?

"चमच्यांचा राडा आणि महिलांचा रामराम"

बाहेरच्या मोठ्या conclave आणि मुलाखती घेऊन मार्केटिंग टीम आपली टार्गेट पूर्ण करणार, श्रेय मात्र अँकरला! मग "भूषण" कोण खाणार?" हे पाहताना काहींच्या पोटात दुखायला लागलंय! त्यातच साम आणि २४ तासवरून आलेल्या मार्केटिंग टीमच्या चमच्यांनी उच्छाद मांडलाय. महिला कर्मचाऱ्यांवर विशेष राग ठेवणाऱ्या या टोळीमुळे चार महिला पत्रकारांनी ‘रामराम’ ठोकला!

मग काय? चमचे खुश! आता दुपारचे पेड शो कोण चालवणार? आपल्याच माणसांना पुरस्कार मॅनेज करून देणाऱ्या खोत साहेबांनी तोडगा काढलाय. HR वर ताशेरे ओढत, आता मार्केटिंग टीमच्या चमच्यांसाठी नवीन अँकर शोध मोहीम सुरू झालीये.

"हॉस्पिटल रिसेप्शनिस्ट ते न्यूज अँकर – पुढचं स्टेशन कुठे?"

नवी अँकर शोधण्याच्या मोठ्या नाटकाला सुरूवात झाली. संपादक साहेबांनी जोर देऊन पत्रकारितेचा अभ्यास असलेल्या व्यक्तीलाच घेण्याचं सुचवलं, पण त्यांचं ऐकणार कोण?

खोतसाहेबांनी बऱ्याच दिल्ली फेऱ्या मारून, हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या बाईला अँकर बनवायचं ठरवलंय. नुसते पॅनेल डिस्कशन नव्हे, आता न्यूज अँकरही ‘डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन’सारख्या मिळणार!

बदलापूरच्या मोरे बाईंच्या ‘५० हजार रोख पगाराच्या भुरळीत’ मार्केटिंग टीम फसली की खोटं वाटावं! HR ने विरोध केला, तर त्याला "गुजरात दाखवण्याची" धमकी देण्यात आली! आता टीव्ही ९ च्या स्टुडिओत भाजीवाली, केळीवाली आणि तोंडात गुटखा भरलेली मावावाली अँकर म्हणून दिसली, तर कुणी आश्चर्य करू नये!

"पत्रकारिता हरवली आणि नाटकबाजी उरली!"

आता टीव्ही नाईनवर बातम्यांपेक्षा अंतर्गत सिरीयल जास्त रंगणार! आतापर्यंत नेत्यांची मुलाखत घेणारे आता HR वरही हुकूमत गाजवताहेत. पेड शो, चमच्यांचं साम्राज्य आणि अजब नियुक्त्यांनी पत्रकारिता 'टीव्ही नाईन  ड्रामा कंपनी'मध्ये रूपांतरित झालीये!

संपादक साहेब, हा संपादकीय डेस्क आहे की राजकीय आखाडा? चला, आता काही दिवसात 'गावठी कुशल कामगारांना' अँकर म्हणून बघायची तयारी ठेवा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या