परळीच्या राखचोरीची राखरांगोळी आणि पंकजा मुंडे यांचा एनडी टीव्ही मराठीला इशारा !

 


 

बीड जिल्ह्यात हल्ली हत्येपासून ते राखचोरीपर्यंत सगळंच "हॉट टॉपिक" बनलंय. आधी मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राजकीय वातावरण तापलं, आता परळी औष्णिक वीज प्रकल्पाच्या राखचोरीवरून नवीनच गोंधळ सुरू झालाय.

"सूत्र" बोललं आणि "तुफान" आलं!

एनडी टीव्ही मराठीवर "सूत्रांच्या" हवालेने बातमी आली की पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या राखचोरी प्रकरणावर गप्प आहेत! २०१९-२०२० मध्ये राख चोरी मोत्यासारखी वाहत होती , शेकडो कोटींच्या राखेवर गावगुंडांनी भरारी घेतली, सुरक्षा रक्षकांची मारहाण करत चक्क वीज प्रकल्पालाच "खोदून" खाऊ लागले. पण मंत्री बाई मात्र "चुपचाप"!

पंकजा मुंडे यांचा "बिजली" ट्विट बाण!

इतकं सगळं अंगावर आलं, म्हटल्यावर पंकजा मुंडे यांनी "राखेतला हिरे" उगाळणाऱ्यांना सरळ फटकारलं. "This is total rubbish!" असं म्हणत त्यांनी बाण सुटला. पुढं त्यांनी स्पष्ट केलं –
"माझ्या टेबलावर कुठलीही फाईल आलेली नाही, येऊ शकत नाही. हा ऊर्जा विभागाचा विषय आहे!"

म्हणजे साधं लॉजिकल गोष्ट आहे – पर्यावरण मंत्री असूनही, पर्यावरणासंबंधी फाईल त्यांच्याकडे यायला नको!
या "सूत्ररूपी" गुप्तहेराला कुणी हाडतुस करून विचारायचंय की राखेच्या चोऱ्या कुणाच्या घरात भाजायला घेतल्या होत्या? आणि ज्या गावगुंडांनी सुरक्षा रक्षकांना "फाईल" केलं, त्यांना शोधायचं सोडून मंत्री बाईंनाच का टार्गेट केलंय?

 राखेतली राखरांगोळी थांबली पाहिजे!

बीड जिल्ह्यात कुणी मेलं, की राजकारण पेटतं, कुणी झोपलं, की कोटींचा घोटाळा होतो! आता ही राख कुणाच्या चुलीत घालायची, आणि कुणाच्या हातावर टाकायची, हे सत्ताधाऱ्यांनी ठरवावं. पण "सूत्रां"च्या भरोशावर जळणारे हे वाद राजकीय फडफडीत भाकरीसाठी भाजत राहतील, हे मात्र नक्की!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या