बीड : खोक्या LIVE! पोलिसांना नाही, पण टीव्ही 9 ला कसा सापडला?

 


बीड जिल्ह्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हरणाची शिकार, पैशांची उधळण, बॅटने मारहाण – असे कारनामे करताच त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस त्याचा शोध घेत असताना तो मात्र आरामात एका वृत्तवाहिनीवर EXCLUSIVE मुलाखत देतोय!

पोलिसांना नाही, पण टीव्ही 9 मराठीला सापडला खोक्या!

काय गंमत आहे! पोलिसांना हा खोक्या काही सापडत नाही, पण टीव्ही 9 मराठीचा रिपोर्टर मात्र अगदी बिनधास्त त्याची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतो. पोलीस जिथे नाकाम, तिथे हा रिपोर्टर कसा यशस्वी झाला? हा प्रश्न पोलिसांना पडला नसेल, पण जनतेच्या मनात मात्र हा मोठा संशय निर्माण झालाय!

टीव्ही 9 मराठीवर या खोक्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आणि आपण सामाजिक कार्यकर्ते असल्याचा दावा केला. म्हणजे हरण मारणं, नोटा उधळणं आणि बॅटने हाणणं हे नवीन सामाजिक कार्य ठरलं की काय?

पत्रकारितेची ही कोणती नवी परिभाषा?

एका फरार गुन्हेगाराला थेट प्लॅटफॉर्म देणं आणि त्याच्या ‘स्पष्टीकरणाला’ महत्त्व देणं ही पत्रकारितेच्या कोणत्या चौकटीत बसतं? हा प्रश्न उभा राहतो. खरं तर, आता पोलिसांनी टीव्ही 9 मराठीच्या रिपोर्टरलाच ताब्यात घेऊन खोक्याचा पत्ता विचारायला हवा!

खरंच, हंटरपेक्षा ‘मुलाखत’ जोरात!

कधी काळी गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांकडे हंटर असायचे, पण आता टीव्ही 9 सारख्या वाहिन्या त्यांना ‘हंटर’ नको, मुलाखतीचा मायक्रोफोन पुरतोय!

 पत्रकारिता की गुन्हेगारीचा ‘पेड’ प्रवक्ता?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या