गोविंद शेळके यांचा राजीनामा : ‘वळणावरचा विसावा’ की नव्या प्रवासाची नांदी?

 

पत्रकारिता क्षेत्रात चर्चेचा धुरळा उडवत एबीपी माझाचे बीड जिल्हा प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी राजीनामा दिला. ‘बेरक्याने’ ही बातमी बाहेर काढल्यानंतर अनेकांना धक्का बसला. शेळके यांनी १ डिसेंबरलाच फेसबुकवर "जरा विसावू या वळणावर" अशी पोस्ट केली होती, आणि आता राजीनाम्याने तीच पोस्ट नव्या चर्चेला खाद्य पुरवते आहे. विसावा घ्यायचा की नवा मार्ग शोधायचा? हा प्रश्न आता त्यांच्या चाहत्यांसमोर उभा आहे.

एका अभ्यासू आणि हाडाच्या पत्रकाराचा असा अचानक ब्रेक लागणं अनेकांना खटकलं. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना "निवृत्ती नको, नव्या सुरुवातीकडे वळा!" असा प्रेमळ सल्ला दिला जातोय. पण शेळके यांनी स्वतःच या चर्चा थोपवताना "गेल्या १५ वर्षांत जे कमावलं, त्या बळावर काहीतरी नवीन करणार" असा इशारा दिला आहे.

म्हणजेच, ही निवृत्ती नाही, तर नव्या इनिंगची तयारी! गोविंद शेळके पुढे कोणता नवा मार्ग निवडणार? स्वतंत्र पत्रकारितेत काय भन्नाट प्रयोग करणार? हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. बेरक्याचं बारीक लक्ष आहे, पुढील अपडेट लवकरच!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या