पाद्री पत्रकारिता: भारतरत्न पुरस्कारासाठी अर्ज मागवावा!

 

पत्रकारितेची कळा आणि कला दोन्हीही  जमली पाहिजे, असं आमच्या गुरू नारदांनी शिकवलं होतं. पण हल्लीच्या डिजिटल युगात "पाद्री पत्रकारिता" बहरली आहे. म्हणजेच, पादासारखीच गाजावाजा करणारी, पण वासाच्या भीतीने लोक लांबूनच उभी राहतात अशी पत्रकारिता!

डिजिटल मीडिया आलं आणि गावोगावी तथाकथित पत्रकारांचा सुकाळ झाला. कोणतंही शिक्षण नसावं, पत्रकारितेचं प्रशिक्षण नसावं, फक्त एक स्मार्टफोन, नेट पॅक आणि युट्युब चॅनल असलं की झालं, पत्रकार तयार! अशी कॉपी-पेस्ट पत्रकारिता म्हणजे खरं तर डिजिटल युगातला 'पाद'च!

आता हेच पहा ना, एका युट्युब चॅनलवाल्याने चक्क "नवरा सतत टराटरा पादतो म्हणून बायको माहेरी गेली" अशी बातमी दिली. कसली बातमी आणि कसला प्रकार! नवरा कोण? बायको कोण? गाव कोणतं? काहीच नाही! बातमीमध्ये इतकी शुद्ध हवा, की वास येऊ नये!

आता या पाद्री पत्रकाराला आदर्श पत्रकारिता पुरस्कार देणं भागच आहे. कारण बातमी इतकी भन्नाट की लोकांनी तुटून कमेंट्स केल्या. गावच्या सवाष्ण बायका आणि उभा गाव या बातमीवर चर्चा करू लागला. काहींनी तर बायकोला परत आणण्यासाठी "वायुविकारावर इलाज" सुचवले!

मी सरकारला  हात जोडून विनंती करतो की, या पत्रकाराला भारतरत्न पुरस्कार द्यावा! कारण इतकी फुंकरबाज बातमी तयार करणं हे साधं काम नव्हे! सोबतच पत्रकार संघटनेने "आदर्श पत्रकारिता पुरस्कार" देऊन सन्मानित करावं.

उद्या कदाचित पाद आणि पत्रकारिता यांची एकत्र व्याख्या तयार करावी लागेल. कारण पादाला वास असतोच, पण हल्लीच्या पत्रकारितेला कधी कधी त्याहूनही जास्त दुर्गंधी असते. पादतोय म्हणून बायको पळाली हे जरी खरं असलं, तरी बातमीत किमान सत्य आणि ठोस माहितीची फुंकर तरी असावी की नाही!

बेरक्या म्हणतो, "पाद्री पत्रकारांना फुल मार्क्स द्या... पण हवा तेवढी स्वच्छ ठेवा!"

Video Link

https://www.instagram.com/reel/DHAaLMOIJRP/?utm_source=ig_web_copy_link


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या