साताऱ्यातील पत्रकारिता आणि राजकीय कटकारस्थानांच्या छायेत तुषार खरात प्रकरण?

 

साताऱ्यातील पत्रकारिता आणि राजकारणाच्या गूढ पटावर नवा वादंग निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी  महाराष्ट्राचा मानबिंदूच्या  सातारा आवृतीमध्ये तुषार खरात यांच्याबद्दल प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने एका चिकित्सकाने काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रश्न केवळ तुषार खरात प्रकरणापुरते मर्यादित नाहीत, तर यामागील मोठ्या राजकीय आणि पत्रकारितेतील कटकारस्थानांचा उलगडा करणारे ठरू शकतात.

काही अनुत्तरित प्रश्न

संबंधित राजकीय नेता  यांच्या कथित विवस्त्र अवस्थेतील फोटो प्रकरणाला आता काही काळ लोटला असला, तरी या घटनेशी संबंधित अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. या प्रकरणात साताऱ्यातील काही पत्रकार, वकील, आणि पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेतला जात आहे.

  1. पीडित महिलेची आणि  संबंधित राजकीय नेता  यांची ओळख एका पत्रकाराने घालून दिली, असे पीडितेच्या मुलाखतीत स्पष्ट झाले आहे. मात्र, त्या पत्रकाराचा उद्देश काय होता? आणि पुढे घडलेल्या नाट्यात त्याची काय भूमिका होती?
  2. गुन्हा दाखल होण्याआधी एक ‘पेज थ्री’ पत्रकाराकडे हे विवस्त्र फोटो होते. पण त्या फोटोचे पुढे काय झाले? कोणी ते व्हायरल केले?
  3. पीडित महिलेची ओळख करून देणारा पत्रकार आणि फोटो असलेल्या पत्रकाराची मिलीभगत होती का?
  4. गुन्हा दाखल होण्याआधी पेज थ्री पत्रकार आणि संबंधित राजकीय नेता यांच्यात फोन कॉल झाले होते का? पोलिसांकडे त्याचे रेकॉर्ड आहेत का? त्या संभाषणात काय चर्चा झाली? हा वाद मिटवण्याचा सल्ला दिला गेला, की आणखी चिघळवण्याचा?
  5. प्रकरण मिटल्यानंतर ‘२ कोटी रुपये आणि मुंबईतील फ्लॅट मिळाला’ ही अफवा नेमकी कुणी पसरवली?
  6. पीडित महिला आणि संबंधित राजकीय नेता यांच्या वैरी असलेल्या व्यक्तींची पुण्यात गुप्त बैठक दोन पत्रकारांनी आयोजित केली होती का?

तुषार खरात प्रकरणाचा या घडामोडींशी संबंध?

महाराष्ट्राचा मानबिंदूच्या  बातमीनंतर तुषार खरात प्रकरण नव्याने चर्चेत आले आहे. साताऱ्यातील काही पत्रकार आणि राजकीय मंडळी या प्रकरणात गुंतलेली आहेत का? पोलिसांनी या धाग्यांना एकत्र जोडून तपास केला तर मोठे रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.

पत्रकारिता की सत्तेचा खेळ?

साताऱ्यात पत्रकारिता ही केवळ चौथ्या स्तंभाची भूमिका बजावत नाही, तर अनेकदा सत्तेच्या डावपेचांचा भाग बनत असल्याचे चित्र समोर येत आहे. पत्रकारच जर कटकारस्थाने रचत असतील, तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा?

या गूढ नाट्याचा शेवट कोणत्या दिशेने होतो, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या