सोलापूरच्या मीडियात सध्या तीन खंडणीखोर पत्रकारांची जोरदार चर्चा सुरू आहे. एका मीडिया ग्रुपवर बेरक्याने दिलेल्या बातमीवर भरपूर चर्चा झाली. एकजण म्हणाला "तांदूळ शिजले होते, पण करपून वास आला"
सोलापुरात एका मार्केट कमिटीच्या दादाकडून टीव्ही मीडियाच्या तीन पत्रकारानी घेतलेली साडेतीन लाखाची खंडणी नाक घासून परत करण्यात आली आणि मीडियात जोरदार चर्चा रंगली.
एक ज्येष्ठ पत्रकार म्हणाले, पत्रकारितेत आता खंडणीखोरांचा सुळसुळाट झाला आहे, यामुळे सोलापूरची बदनामी झाली आहे.
ते तीन पत्रकार कोण ?
सोलापूरमधील ही घटना खरी असली तरी, पत्रकार एकमेकांकडे बोट करीत आहेत. तो म्हणतो, मी नाही हा आहे... दुसरा म्हणतो तोच आहे, मी नाही...
खंडणी देणारा दादा म्हणतो, मी योग्य वेळी क्लिप देईन ... आता प्रकरण थोडं शांत झालं आहे.
पोलिसांनीच आता या प्रकरणाचा छडा लावून, खंडणीखोर पत्रकारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काही जण करीत आहेत.
0 टिप्पण्या