"दुबईत मॅच... इथे कॅच!" – ठाकूरजींच्या दुबई धम्माल मुळे 'माझा'त गोंधळाचा बाऊन्सर!

बेरक्या उर्फ नारदचा विशेष 'खबर-खेळ' रिपोर्ट





उघडा डोळे, बघा नीट... चॅनल म्हणजे आपलं एबीपी माझा, पण कथा आहे थेट एबीपी माझाचा ब्युरो चीफ गणेश ठाकूर यांच्या बॅकडोअर दुबई दर्शनाची!

एक दिवस फेसबुक उघडलं आणि ‘थोबडं’ उघडलं — गणेश ठाकूर साहेब दुबईच्या क्रिकेट मॅचमध्ये सेल्फी मारताना दिसले! कॅमेरामन नव्हता, पण फोटोबाज चांगलाच ऍक्टिव्ह.

काही कळायच्या आत,  एबीपी माझावाल्यांनी त्यांना कव्हरेजसाठी फोन केला... पण साहेब फोन कट करत होते. म्हणजे हातात माईक , डोक्यात गेम आणि फोनचा "एअरप्लेन्स मोड!"

एबीपी माझाची 'स्पोर्टी' असाइनमेंट टीम मुंबईत घाम गाळत होती आणि तेवढ्यात ‘झिरो अवर मॅडम’ उर्फ सरिता कौशिक यांना कळलं की ब्युरो चीफ गायबच आहेत... आणि थेट दुबईत!

सरिता मॅडम भडकल्या. म्हणाल्या, “हा न विचारता गेलाय? आता दाखवतेच!” त्यांनी थेट मालकांना मेल ठोकली.

मालकही भडकले. "दुबईला मॅच पाहायला गेले म्हणे? मग हा पिचवरून बाहेर!"


आणि काय... ठाकूरजींना 'नारळ' देण्यात आला. पण खेळ इथे संपत नाही. एबीपी मुख्य संपादक  राजीव खांडेकर आणि कंपनी म्हणाले, “अहो, हे तर आपले मॅच विनर आहेत!” आणि सुरू झाली चॅनलातली ‘इमोशनल स्पिन बॉलिंग’.

झिरो अवर मॅडम म्हणाल्या, “तो राहणार असेल, तर मी नाही!” अखेर, ‘कमप्रोमाईज पॅकेज’ निघालं – ठाकूरजींना ‘माझा’ वरून काढून एबीपी न्यूज मुंबई ब्युरो’त पाठवण्यात आलं.

आता 'माझा'च्या ब्युरो चीफ पदावर वेदांत नेब नावाचा नवा बॅट्समन उतरलेला आहे...

पण गंमत अशी – आता 'माझा'त मॅच आहे, पण बॅट-पॅड नातं कायम ताणलेलं आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या