"अदानीचा चॅनल की नाट्यशाळा? डॉक्टर कविता, खिचडीचं पीसीआर आणि इन्क्रिमेंटचा शॉक!"

ध्यान द्या! अदानी यांच्या नावावर सुरू झालेला एक मराठी चॅनल सध्या न्युजरूमपेक्षा सिरियलचं सेट वाटायला लागलाय. बातम्यांपेक्षा ‘डायलॉग’, TRPपेक्षा ‘नाट्यछटा’ आणि प्रेक्षकांपेक्षा ‘पगारवाढ’ चर्चेत आहे. आणि सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत – डॉक्टर कविता!

हो, त्या डॉक्टर  कविता. त्यांना वाटतं, त्यांना सगळं काही माहीत आहे – पण सॉफ्टवेअरचं A देखील माहित नसताना त्या पीसीआरमध्ये तांत्रिक चर्चा करतायत. मग काय? "क्लोज अपला क्रॉप करा" म्हणता म्हणता स्वतःच कट होतात!

आता आपण 'खिचडी'कडे वळूया – अर्थात, वरिष्ठ मंडळींच्या जबाबदाऱ्यांकडे. जुन्या चॅनलमध्ये जे सगळं सांभाळायचे, ते आता एका व्यक्तीचंच "मिनी मंत्रालय" झालेत. बाकी टीम आहे पण ती “फाईलसुद्धा न उघडणाऱ्या सचिवांसारखी” बसून आहे. प्रोडक्शन टीमची जबाबदारी तर असं वाटतं, जणू ती हरवलेली वस्तू आहे – शोधा पण लक्षात ठेवू नका!

आणि हो, इन्क्रिमेंट!
चॅनेलच्या पहिल्या पगारवाढीची वाट बघणारे कर्मचाऱ्यांचे चेहरे, जणू निकालात नापास झालेल्या मुलांसारखे झालेत. काही VIP मंडळींना भारी इन्क्रिमेंट मिळाली, बाकीच्यांना मात्र 'टी च्या वर' वाढ नाही. कारण? अंतर्गत 'राजकारण', गटबाजी, आणि 'मी मोठा' ही सिस्टीम!

तर मंडळी, "मालक अदानी, चॅनलची कहाणी" आता कुठे सुरू झालीये.
डॉक्टर कविता, पीसीआरची खिचडी आणि इन्क्रिमेंटचा कडवट वरण
सगळं चाललंय, फक्त बातम्या सोडून!

- बेरक्या

 (जो अजूनही न्युजरूममध्ये ‘लॉगइन’ करून काम करतो)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या