"अदानींचा न्यूज चॅनेल : नावाच्या शोधात हरवलेले ज्ञानी!"



बरं का मंडळी, चॅनेलला एक वर्ष पूर्ण झालं... पण अजूनपर्यंत त्या बिचाऱ्या शोला नावच नव्हतं! एक वर्ष शो चालू होता, प्रेक्षक बघत होते, जाहिराती येत होत्या, पण शोचं नाव? तो मात्र अनाथच राहिला!

शेवटी, चॅनेलचे ज्ञानी लोक एकदाचे जागे झाले. मीटिंग बसली. चहा झाला. पाणी झालं. आणि नावं द्यायचा निर्णय झाला. पण गंमत अशी की, हा निर्णय ज्युनिअर लोकांना सांगायचं कुणाला सुचलंच नाही!

जुनियर लोक बिचारे पुढल्या दिवशी ऑफिसमध्ये येऊन शोधतायत – “आपलं शोचं नाव काय ठेवलंय?”
वरचे लोक मात्र गप्प – "तुम्हाला सांगितलं होतं ना.... ?"


"पॅकेज प्रोड्युसरची पॅरड"

एका प्रोड्युसर मॅडमचा तर वेगळाच मामला! त्या दिवसभरात ५ वेळा विचारतात –
“माझं पॅकेज कोण करणार?”
“ते सर आले नाहीत का अजून?”
“मग माझं पॅकेज कोण करणार??”

तेवढ्यात एखादा कर्मचारी जवळ आला, की लगेच गोड आवाजात –
“अरे वा! किती छान वाटतंय तुला बघून!”
(आतून मात्र – “आधी माझं पॅकेज कर मग पुढं बघ!”)


"योगबाबांचा ‘वर्क’आसन"

आणि मग येतो “योगबाबा”!
हे गृहस्थ दररोज लेक्चर देतात – “काम कसं करायचं”, “टीम कसं हँडल करायचं”, “ऑफिसमध्ये टाइमपास नको”.
पण स्वतः मात्र...
ऑफिसात कोण आलं, कोण गेलं यावर लक्ष!
वरिष्टांच्या मागे उगाचच फिरत राहायचं. जणू “मीच या चॅनेलचा मेरुमणी”.
पण खरं काय? झिरो. शून्य. फुसका फटाका!

त्यांचे रिपोर्टिंग मॅनेजर मात्र समाधानी – "बाबा भारीच काम करतोय!"
बाबा मात्र : “योगा करणं हीच खरी सेवा!”


"रनडाऊनची रामकहाणी"

काही प्रोड्युसर तर त्यांच्या शोशिवाय दुसऱ्याचा रनडाऊन बघायलाही तयार नाहीत.
त्यांचं ब्रीदवाक्य – "मी माझा रन बघणार!"

पीसीआर ओरडतंय – “रनडाऊन कुणी बघणार?”
उत्तर? "शांत राहा, ध्यान लावा!"


"मोटीच्या पुढारीपणाच्या अफवा"

सध्या बाजारात अफवांचं वादळ आलंय –
“मोटी आता पुढारी होणार म्हणे!”
लोक विचारतात – “खरंच का? कोणती पोजिशन घेतोय?”

पण खरी भूक आहे, ‘पॉवर पॅकेज’ची!


"राजीनाम्यांची रेल्वे येतेय!"

शेवटी बातमी अशी आहे की, मोठ्या प्रमाणावर राजीनामे होण्याच्या तयारीत आहेत काही लोक.
ऑफिसमधल्या कुजबुजीनुसार – “चुपचाप बॉक्स भरून ठेवा... पुढचं स्टेशन कुठं आहे बघा!”


बेरक्या म्हणतो
ही गोष्ट फक्त चॅनेलची नाही. ही गोष्ट आहे व्यवस्थेची, गोंधळाची आणि "मी महान!" समजणाऱ्या लोकांची.
आणि तरीही चॅनेल चालतोय... म्हणजे 'जर्नालिझम'चा "योग" अजून तुटलेला नाही!





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या