ध्वनीफीत वाजवा... "लोकमत-बदल गाथा सुरू आहे!"
कोल्हापूरच्या ‘लोकमत’च्या पानांवरून निवृत्तीची घंटा वाजली आणि वसंत भोसले यांना “धन्यवाद वगैरे…” देऊन मंचातून खाली उतरवण्यात आलं. पण खेळ इथेच संपत नाही! आता ‘लोकमत सोलापूर’चे पेज नंबर मॅनेजर, उर्फ कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनी कोल्हापूरच्या गडावर ‘किल्ला कोल्हापूर’ फते केला.
सोलापूरची रिकामी खुर्ची भरण्यासाठी ‘नाशिक सेने’चे मिलिंद कुलकर्णी मैदानात उतरले आणि तंबू ठोकून सोलापुरात मुक्काम ठोकला. आता नाशिकचं काय? तिकडे खुर्ची रिकामी, पण ‘नाव कोणाचं?’ यावर मीडियामध्ये खुसपुसाट सुरु...
दिव्य मराठीमध्ये मात्र सरळपणाचा सगळा खेळ बाजूला!
दिव्य मराठीचे सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक नितीन फलटणकर यांना "तुमचं काम संपलं" म्हणत तडकाफडकी हकालण्यात आलं. छत्रपती संभाजी नगरचे ‘वॉर्मअप मोड’मधील महेश रामदासी यांना सोलापुरात रणभूमीत उतरवण्यात आलं आहे.
आणि हो… फलटणकर साहेबांनी लोकमत पुणेच्या एका सिक्रेट पोस्टसाठी इंटरव्ह्यूही दिला आहे… पण अद्याप वेटिंगवर आहेत. म्हणजे बायोमेट्रिक लावलंय, पण OTP नाही आला!
🌀 मिडिया सर्कलमध्ये सध्या व्हॉट्सअॅप स्टेटसचा ट्रेंड:
“बदल अनिवार्य आहे… पण बदली कुठे होणार, हे देव जाणे!”
🕵️♂️ बेरक्या म्हणतो:
मिडियाच्या खुर्च्या बदलल्या की वाऱ्याची दिशा बदलते ! पण हे लक्षात ठेवा — पानं काही कुणाच्या बाबतीत कायमची नसतात... संपादक असोत की बातमीदार, पान वळतं तसं खेळ बदलतो!
0 टिप्पण्या