हो! पत्रकारिता अजूनही LIVE आहे –
LIVE इंस्टाग्रामवर, LIVE फेसबुकवर, LIVE ‘माझ्या बॉयफ्रेंडने मला काय दिलं’ या कव्हरेजवर...
पण तिचा आत्मा?
तो मात्र कालच्या “सेक्स पॉवरच्या गोळ्या”च्या हेडलाईनमध्येच डेड ऑन अरायवल झाला!
ज्यांना एकेकाळी "चौथा स्तंभ" म्हणत होते, ते आज 'क्लिकबेटचा खांब' बनलेत.
अन् बघा गंमत – ज्यांना सत्य मांडायचं होतं, तेच आज सत्याला झाकून Fake Glamourला उघडं करतायत.
गावखेड्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्येवर कुणी LIVE जात नाही.
पण अभिनेत्रीच्या "खाजगी पार्टीत ड्रेस सरकला" यावर मात्र LIVE 30 मिनिटं, 5 अँकर आणि 10 रिपोर्टर!
हे आहे का पत्रकारिता? की रिअलिटी पोर्नशोची ओव्हर-ड्रेस्ड आवृत्ती?
आज जे संपादक स्वतःला मोठे म्हणवतात, त्यांनी स्वतःचा ‘पेड मीडिया सर्टिफिकेट’ गळ्यात घालावा.
कारण त्यांचं एकच सूत्र –
“Breaking म्हणजे Breasts+Shocking +Thigh-high TRP!”
सन्मान?
अरे, जो पत्रकार जनतेच्या प्रश्नांसाठी लढायचा, तो आता म्युच्युअल फंड जाहिरातीत दिसतोय.
आजही खरे पत्रकार कुठं कुठं आहेत –
तिथं जिथं मजकूर कमी, मनगटाची ताकद जास्त आहे.
तिथं जिथं TRP नाही, पण TRUTH अजूनही जिवंत आहे.
बाकीच्यांचं काय?
LIVE तर आहेत, पण सन्मान नाही.
स्टुडिओ आहे, पण स्पाईन नाही.
मायक्रोफोन आहे, पण आवाज नाही.
उद्या वाचा – भाग ५ : “अहो पत्रकार की कंटेंट क्रिएटर? आणि कंटेंट म्हणजे काय? कशातही 'कंटेंट'!”
0 टिप्पण्या