आता सगळ्या माध्यमांचा एकच नवा बिरुदवाचक शब्द – "Content Creator"
पत्रकार म्हणायचं लाज वाटते!
ते विचारतील – “अहो, तुम्ही कुठे काम करता?”
उत्तर – “मी Content Creator आहे जी... डिजिटल मीडियात!”
म्हणजे नेमकं काय करता?
– सकाळी उठून Instagram Reel बनवतो, दुपारी WhatsApp वर फॉरवर्ड येतील त्यावर थंबनेल बनवतो,
– संध्याकाळी Youtube साठी टायटल देतो : 'OMG! तिने असं काय केलं?'
– आणि रात्री एक 'SEX गोळी घेतली, मेला' अशा हेडलाईनची बातमी टाकतो.
बस्स, झालं CONTENT!"
आजची पत्रकारिता म्हणजे –
कंटेंटच्या नावाखाली कचराकुंडी भरायची,
थंबनेलमध्ये cleavage द्यायचा,
आणि पब्लिकने गचाळ कमेंट्स केल्या की – “ENGAGEMENT वाढली म्हणायचं!”
आता TRUTH पेक्षा TREND महत्त्वाचा झालाय!
अन्वयार्थपेक्षा Hashtag महत्त्वाचा झालाय!
आणि विचारांपेक्षा Viral महत्त्वाचं झालंय!
संपादकही आता ‘न्यूजरूम’ चालवत नाहीत – ते Reels Factory चालवतात.
जिथं रिपोर्टर म्हणजे 'Breaking News DJ'
आणि बातमी म्हणजे ‘व्हिडीओच्या बॅकग्राउंडला रिंगटोन लावलेलं TikTok स्क्रिप्ट!’
वाचक विचारतो – “भाऊ, खरं काय आहे?”
तर मीडियाचा उत्तर –
“भाऊ, खरं वाचायचंय का? मग Pornhub वर जा, आम्ही तर फक्त ‘Breaking Thighlight’ देतो!”
🔚 शेवटचं वाक्य – एक प्रहार
पत्रकारितेचा दर्जा आता 'CTRL+C + WhatsApp फॉरवर्ड + Canva Thambanel = BREAKING' एवढाच उरला आहे.
म्हणूनच पत्रकारिता नाही मेली… तिला Like, Share, Subscribe करायच्या नादात शुद्ध वारसा विसरून टाकलंय.
जर ही मालिका आवडली असेल, तर "Share" नको –
जरा डोळे उघडा, अन् जे उरलंय त्या पत्रकारितेला वाचवा!
– "बेरक्या उर्फ नारद" च्या चिमट्याने...
आपल्याच घरच्यांना आरसा दाखवणारी ही अंतिम चपराक!
समाप्त.
(पण विचार सुरूच राहो…)
0 टिप्पण्या