महाराष्ट्रात काही गोष्टी गुप्त राहतात आणि काही गोष्टी व्हॉट्सअॅप स्टेटस बनतात…
पत्रकार संघटनेचा प्रकार दुसऱ्या प्रकारात मोडतो!
दहा लाखांची देणगी, भाईचा व्याज व्यवसाय, गाडीचं गूढ आणि सावत्र भाऊ याच्या डायलॉगनंतर, आता एक नवा स्फोट झाला –
“पेड लीडरचा व्हॉट्सअॅप ग्रुप डिलीट झाला!”
ही घटना एकदम अचानक घडली.
रात्री ११.५९ वाजता… ग्रुपचं नाव होतं –
"पत्रकार हिताची मातृसंस्था "
(तसं मातृसंस्था म्हणायचं, पण आतून हे ग्रुप म्हणजे "चमच्यांचे उल्हासनगर !")
लाखो रुपयांचे व्यवहार आणि ‘'पेड लीडरचा बिझनेस अपडेट’ याचं हॉटस्पॉट होता हाच ग्रुप!
पण झालं असं...
एका सदस्याने प्रश्न विचारला –
"गाडी कुणाच्या पैशातून आली याचं रजिस्ट्रेशन दाखवा!"
आणि लगेच ग्रुपवर "हा विषय इथे नको!", “गर्दीतल्या गदारोळात चर्चा करू!” असे उडवाउडवीचे संदेश आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता…
"You have been removed from the group"
"This group no longer exists"
...असं सर्व सदस्यांना नोटिफिकेशन मिळालं!
त्याच रात्री 'पेड लीडर' फेसबुकवर स्टेटस टाकतो –
📸 “गाडीचा पहिला प्रवास, पुण्याला संघटनात्मक भेट...”
तळटीप – “आमच्या मेहनतीचा, मुलाच्या प्रेमाचा विजय!”
आता संघटनेतील काही वरिष्ठांनी ‘बेरक्या’कडे गुपचूप सांगितलं –
“ही गाडी सीएम साहेबानी दिलेल्या दहा लाखांच्या देणगीतून घेतली असावी, पण पब्लिकली मुलाच्या प्रेमाचं सांगणं जास्त इमोशनल मार्केटिंग!” 😒
अखेरची अवस्था –
-
एक गाडी आली, पण विश्वास गेला!
-
व्हॉट्सअॅप ग्रुप गेला, पण शंका उरली!
-
सदस्य फेकले गेले, पण ‘शेम शेम’ वाढत गेलं!
बेरक्याचा टोला
पत्रकार संघटना चालवायला व्हिजन लागतो, पण इथे व्हॉट्सअॅप अॅडमिनची पावर पुरेशी आहे!
गाडी कुणी दिली हे अजून उलगडलं नाही, पण “सत्यजित राय” असते तर यावर थेट "गुप्तधनाचा पत्रकार" चित्रपट केला असता!
वाचत राहा, फॉलो करत राहा – बेरक्या उर्फ नारद
0 टिप्पण्या