🎬 पिपली लाईव्हच्या पुढचं सीक्वेल महाराष्ट्रात तयार होतंय आणि त्याचं नाव आहे – "दारूड्या कासले LIVE!"
मीडिया दारू पित नाही – हे सांगायला मीडिया रोज पाण्यातून बातम्या काढतोय. पण जर कधी दारू प्यायलाच लागली, तर ती “रणजित कासले ब्रँडची” असते, ज्याचा ‘हँगओव्हर’ संपत नाही.
🚨 बीडच्या सायबर पोलिस स्टेशनचा पीएसआय – रणजित कासले. सध्या निलंबित, पण मीडियासाठी एक्सक्लुझिव्ह कंटेंट क्रिएटर.
एक महिन्यापूर्वी हा रणजित, वरिष्ठांची परवानगी न घेता थेट सुरत गेला… निव्वळ चौकशीसाठी नाही हां, थेट बार्गेनिंगसाठी!
आरोपीशी बारगेनिंग केली, व्हिडीओ व्हायरल झाला, आणि शेवटी कासले सस्पेंड झाला. पण... कासले सोशल मीडियावर लाईव्ह झाला! 🎥🍷
🍾 कथा सुरू होते - कासलेचा ‘कॅमेरा ऑन’ झाल्यावर...
📹 पहिला हल्ला: एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीवर “शिंतोडा” – मीडियाला मसाला मिळाला, त्यांनी लगेच "Breaking" केला.
📹 दुसरा एपिसोड: न्यूज १८ लोकमतचा अँकर विलास बडे – ‘विलासीत’ फसवलं म्हणे!
📹 तिसरा भाग: टीव्ही९ मराठीचे उमेश कुमावत – कासले म्हणतो, “मी फसलो!” मीडियाने मात्र म्युटचं बटन दाबलं!
📹 आणि मग – धनंजय मुंडे एन्ट्री!
"निवडणुकीत पैसे वाटले..." – असं सांगून मीडियाला पुन्हा अँकरवर बसवलं.
📹 पण आता काय?
सरपंच संतोष देशमुख मर्डर केस – कासले म्हणतो, "वाल्मिक कराडचं एनकाउंटर करायला मला ५ कोटी, १० कोटी, ५० कोटी ऑफर आली होती!"
🎬 थेट पॅन इंडिया स्क्रिप्ट!
एका दारुड्याच्या तोंडून एवढा 'स्क्रिप्टेड कंटेंट' ऐकून, न्यूज चॅनल्सने एकच केलं –
"BREAKING! EXCLUSIVE! TRUTH UNCENSORED!"
📺 मीडिया झालं ‘मेडिया-रेडियाक्टिव्ह’
कासले दारू पिऊन व्हिडीओ करतो, आणि मीडियावाले हे दाखवतात...
मग तो म्हणतो – "दारू पिलेला खोटं बोलत नाही..."
आणि मीडियाचे रिपोर्टर टाळ्या वाजवत म्हणतात – "बरोबर, आम्हीही कधी खोटं दाखवत नाही!"
🎤 "Mediagate" चा ‘मी दारूगेट’!
कासलेची मुलाखत घ्यायची म्हणजे – “दारूच्या ग्लासात TRP ढवळून प्यायचा!”
तर मित्रांनो,
‘पिपली LIVE’ मध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केली होती,
पण या कासले LIVE मध्ये,
मीडियानेच स्वतःच्या आत्मसन्मानाची हत्या केली आहे!
🪞 शेवटी कसं वाटतंय मीडियावाल्यांना?
कासले बोलतो आणि TRP वाढतो,
पण खरं तर विश्वास संपतो!
(लेखक: ‘बेरक्या’ – दारू पिणारा नाही, पण वास्तवाचं नशा चढवणारा)
0 टिप्पण्या