बीड - आज सकाळी बीडच्या काही न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडियावर एकच धुमाकूळ!
"राज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल गहाळ! चोरी! खळबळजनक घटना!"
पण थांबा थांबा... ही बातमी खरी होती की कुणाचा मोबाईलची चार्जिंग संपली आणि imagination सुरू झाली?
तर किस्सा असा आहे – मंत्री महोदय मस्साजोगला स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेले होते. एका ठिकाणी मोबाईल खाली ठेवला आणि बांधकाम सुरू असलेल्या घराची पाहणी करत चालत गेले.
मध्येच मंत्री महोदयांना मोबाईल आठवला... त्यांनी पीएला विचारलं –
"मोबाईल कुठंय?"
पीएने उत्तर दिलं – "माझ्याकडे नाही साहेब!"
आणि बस्स...!
इतकं ऐकून तिथल्या कुणीतरी 'सुपरफास्ट रिपोर्टर'ने काहिही न तपासता "मोबाईल चोरी!" अशी ब्रेकिंग न्यूज पाडली.
दोन मिनिटांत बातमी सोशल मीडियावर फिरू लागली –
"साहेबांचे मोबाईल गहाळ! अफरातफर!"
पण खरी कथा पुढे अशी –
एका सज्जन व्यक्तीने मोबाईल मिनिस्टर साहेबांच्या गाडीकडे आणून दिला. जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी मोबाईल साहेबांना सुपूर्त केला. म्हणजे मोबाईल हरवला नव्हता, थोडा फिरून परत आला होता.
शेवटी मोबाईलही थोडा ‘फ्रेश एअर’ घेऊन आला असावा.
या प्रकरणावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी थोडक्यात सांगितलं –
"मोबाईल गहाळ नाही, अफवा पसरवू नका. बाकी आम्हाला रोज अशा 'न्यूज कसरती'मुळे व्यायाम फुकट मिळतोय."
शेवटचा धडा – मोबाईल हरवण्याइतकं धोकादायक काही नसलं, पण बातमी चुकली की पत्रकारितेचा मोबाईल ‘स्वतःची credibility’ हरवतो!
0 टिप्पण्या