भाग २ : “हे TRP आहे की Tandoori Rating Porn?”


पत्रकारितेचा आत्मा आता ICU मध्ये नाही… तो थेट मर्च्युरीत ठेवला गेलाय. आणि त्याच्या खिशात ठेवलंय – "टीआरपीचं डेथ सर्टिफिकेट".

एकेकाळी ज्याचं नाव ऐकलं की सरकार हादरायचं, ज्याच्या लेखावरून चौकशी व्हायची, आणि जनतेला न्याय मिळायचा, तोच आजचा पत्रकार नीना गुप्ता कोणावर काय म्हणाली, प्लॅनेट्सच्या नावावर बाळाचं नाव काय ठेवलं,  कोणाची ब्रा दिसली आणि लिंग बदलले, पुरूषाची झाली स्त्री...; मासिक पाळी येते की नाही? अनाया बांगर म्हणाली...या बातम्या टाकत गेला आहे.

हे काही चुकून झालेलं नाहीये – हे ठरवून केलं जातंय.

"तीन दिवस सेक्स करून मेला", "आईने पोराचं गुपित उघडलं", "गुपचूप लग्न, रात्रीचा धिंगाणा" – या बातम्यांना लाखो क्लिक मिळतात आणि संपादकांच्या डोळ्यात झगमगणाऱ्या अ‍ॅड रेव्हेन्यूच्या नोटा नाचतात.

बातमी का द्यायची?
कारण जनतेला माहिती मिळावी म्हणून – हे आता इतिहासात गेलंय.
आज बातमी का द्यायची?
कारण ‘पेल्यात साप सापडला’ पेक्षा ‘पेल्यातून नागिन निघाली’ हे जास्त व्हायरल होतं!

एका वेबसाईटच्या संपादकाने अलीकडेच पत्रकार अधिवेशनात  सांगितलं –

आम्ही लोकांना जे हवं ते देतो.”

हो! पण मग एक गोष्ट लक्षात घ्या –
तुम्ही वाचकांना बातम्या देत नाहीत, तुम्ही त्यांना ‘ब्रेन पोर्न’ देत आहात!

ज्यांचं काम लोकशाहीला मजबूत करणं होतं, तेच आता तिला soft porn बनवत आहेत.

'पत्रकार' या शब्दाऐवजी 'पब्लिशर ऑफ पेल्विक पॉवर' असं ओळख द्यायला हवीये.

----------------------------------

उद्या वाचा - भाग ३: "“संपादक की सांस्कृतिक सुपारी घेणारे?”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या