“ब्युटी पार्लर LIVE” – अदानीच्या मराठी चॅनलमध्ये सौंदर्य स्पर्धा सुरू आहे का?

 लिपग्लॉस, नेलपेंट आणि डेस्कवर लपवलेला डिओड्रंट... ही ‘न्यूज’ की ब्युटी ट्यूटोरियल?”


अदानीच्या  मराठी चॅनलमध्ये सध्या बातम्यांपेक्षा जास्त चर्चेत आहेत ‘ह्या दोन’... म्हणजे बातम्या सोडून बाकी सगळं चाललंय. सकाळच्या शिफ्टमध्ये "ती" जेव्हा आली, तेव्हा थेट ‘तो’ दिसतोय का, हे बघण्यापासून शिफ्ट सुरू. म्हणजे बघत बसणं ही एकाचं पूर्णवेळ नोकरी!

दुसऱ्या शिफ्टमध्ये आल्यावर ‘ब्युटी पार्लर LIVE’ सुरू झालंय. एकीने नेलपेंट लावलं, दुसरीने केसात फुलं खोवली आणि डेस्कवर काय? फेसपॅक!

एडिटिंग शिकले, पण एडिटिंगपेक्षा "तो" कुठे आहे यावर लक्ष! आणि हो, तिला वाटतं की ती आता व्हिडिओ एडिटर्सची ‘मुख्य अधिकारी’ आहे – कारण चहा पिणं, वरिष्ठांशी हसणं आणि जेवणात “सर, मीच वाढते” म्हणणं हे तिचं प्रमोशन पॅकेज.

दुसरीकडे तिची प्रोड्युसर मैत्रीण – ABPची एक्स. पण इथे आल्यावर ‘कंटेंट कटिंग’चा कार्यक्रम नाहीच. म्हणजे, कट कुठं करायचा याचं ज्ञान नाही, पण कटिंग चहा मात्र वेळेवर!

‘हेडलेस’ म्हणजेच बिनडोक टीमचं परफॉर्मन्स पाहून टीआरपीने आत्महत्या केली. आणि माणिक मोती सारखे मोठे लोक मात्र म्हणतात – “अप्रतिम कामगिरी!” … बहुधा नेलपेंटचा रंग आवडला असावा!


“शिफ्ट बदलली, पण सवयी नाही बदलल्या – बातम्या गेल्या भांड्यात, बोटांना मात्र नेल आर्टचं भविष्य उज्वल!”






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या