मराठी पत्रकारितेच्या आखाड्यात सध्या जोरदार धुरळा उडतोय. रोज संध्याकाळी टीव्ही लावला की डिबेट शोच्या नावाखाली पैलवानांची कुस्ती लागलेली असते. यातच सध्या दोन भिडू चांगलेच फॉर्मात आहेत. एक आहेत न्यूज १८ लोकमतचे विलास बडे आणि दुसरे आहेत एबीपी माझाचे प्रसन्न जोशी.
गेल्या काही काळापासून विलास बडे यांनी आपल्या 'बडे मुद्दे' या शोमधून चांगलाच जम बसवला होता. त्यांची थेट, आक्रमक आणि समोरच्याला बोलू न देणारी शैली अनेकांना भावली. टीआरपीचे आकडे बोलत होते आणि 'बडे मुद्दे' खरंच मोठा ब्रँड बनत होता.
याच 'बडे'गिरीला शह देण्यासाठी एबीपी माझाने आपला जुना भिडू, प्रसन्न जोशी, यांना पुन्हा मैदानात उतरवलं आणि त्यांच्या हातात 'झिरो अवर' नावाचं शस्त्र दिलं. एकेकाळी शांत, संयमी आणि मुद्देसूद प्रश्नांसाठी ओळखले जाणारे जोशीबुवा अचानक 'अँग्री यंग मॅन'च्या अवतारात आले आहेत.
सुरुवातीला जरा शांत वाटणारे जोशी आता थेट विलास बडेंच्या स्टाईलने बॅटिंग करत आहेत. विशेषतः पुण्याच्या गाजलेल्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ज्याप्रकारे त्यांनी धारेवर धरलं, ते पाहून अनेकांना 'अरे, हे तर बडे स्टाईल!' असं वाटून गेलं. शांतपणे प्रश्न विचारणारे जोशीबुवा आता इतके आक्रमक झाले आहेत की समोरच्याची बोलतीच बंद होतेय. जणू काही बडेंच्या शोची स्क्रिप्टच जोशींच्या हातात आली की काय, असा प्रश्न पडावा.
📺 झिरो अवर की बडे अवतार?
जोशी बुवांचा आक्रमक अवतार, बडे साहेबांची ‘कॉपी पेस्ट’ स्टाईल?
मराठी न्यूज मीडियाच्या टीआरपी कुस्तीत सध्या दोन भिडू धडाधड आपटतायत — विलास बडे आणि प्रसन्न जोशी. एकीकडे ‘बडे मुद्दे’ चा बडे धडाका, तर दुसरीकडे झिरो अवरमध्ये शांतपणाच्या मुखवट्यातून आक्रमक माईक मारणारे जोशी बुवा!
🌀 पण आता काय झालंय… ‘झिरो अवर’ मध्ये प्रसन्न जोशींचा आवाज वाढलाय, चेहरा चुरगळलाय आणि प्रश्नांच्या लाटांमुळे पाहुण्यांचे चेहरे पांढरे होतायत. हे सगळं जरा ओळखीचं वाटतंय… का?
📼 हो हो, अगदी विलास बडे स्टाईल! म्हणजेच:
"प्रश्न विचारायचे नाहीत, टाकायचे!"
😤 बुवा, दमाने... पण धमक राहू द्या!
सध्या पुण्याच्या हगवणे-कस्पटे प्रकरणावर झिरो अवरने बऱ्यापैकी झटका दिलाय. रुपाली ताई चाकणकर यांना जरा नकोसे होईल असे प्रश्न जोशी बुवांनी विचारलेत. एकेकाळी 'गुलाबजाम डिबेट' करणारे जोशी बुवा आता चक्क ‘लावून देतो’ स्टाईलमध्ये!
पण बुवा... एक सल्ला!
👉 आक्रमक व्हा, पण आक्रस्थळपणा नको!
👉 सवाल विचारा, पण संवाद उडवू नका!
नाहीतर ‘झिरो अवर’ चा थेट ‘वन टू का फोर’ होईल!
📢 बडे Vs जोशी – कोण घमासानचे सरताज?
📌 बडे बोलतात जोरात – रागात
📌 जोशी विचारतात शांततेत – आघातात
आता प्रेक्षक ठरवणार – ‘माइकचा भोंगा’ कोणाचा मोठा?
बेरक्याला वाटतं, थोडं वेगळं, थोडं बेरकं कराल तर जोशी बुवा टीआरपीवर तुमचं झिरो नाही, ‘हिरो अवर’ होईल!
0 टिप्पण्या