मुंबई: महाराष्ट्रातील मराठी न्यूज चॅनल्सच्या टीआरपीची साप्ताहिक आकडेवारी जाहीर झाली असून, याही आठवड्यात 'न्यूज18 लोकमत'ने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. दर गुरुवारी जाहीर होणाऱ्या या आकडेवारीनुसार, 'न्यूज18 लोकमत'ने 27.4 टक्के टीआरपी मिळवत इतर सर्व चॅनल्सना मागे टाकले आहे.
महाराष्ट्रात एकूण आठ प्रमुख मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवण्यासाठी कायमच चुरस पाहायला मिळते. या आठवड्याच्या टीआरपीच्या शर्यतीत 'न्यूज18 लोकमत'ने स्पष्ट आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर 22.4 टक्के टीआरपीसह 'टीव्ही9 मराठी' आहे.
इतर चॅनल्सची क्रमवारी खालीलप्रमाणे:
साम टीव्ही: 13.4%
एबीपी माझा: 12.7%
झी 24 तास: 11.1%
या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, 'न्यूज18 लोकमत'ने दर्शकांचा विश्वास संपादन करत 'महाराष्ट्राचं एकमत' हा आपला दावा सार्थ ठरवला आहे. तर, इतर चॅनल्सना प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी पुढील आठवड्यात अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.
0 टिप्पण्या