जरांगेंनी ; पेक्षा त्यांनी चव्हाट्यावर आणलेल्या पाचशे कोटींच्या मांडवली क्लिपवाल्यांनी फक्त शिंदे-फडणवीसांच्याच बुडाखाली इस्तू ठेवलाय आणि महायुती सरकारलाच फुटीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे असे नाही तर भल्या भल्यांची तंतरली आहे ; या क्लिप मधले बोलणारे कोण ? त्यांचे बोलविते धनी कोण ? या झूम मीटिंगचा आयोजक प्रायोजक संयोजक कोण ? तिथे एकूण कितीजण आणि कोण कोण होते ? या मीटिंगचे रेकॉर्डिंग कोणी केले ? आणि मुख्य म्हणजे ते रेकॉर्डिंग जरंगे यांच्यापर्यंत कसे ? आणि कोणा मार्फत पोहचले ? त्या मागचा संबंधितांचा हेतू उद्देश आणि इरादा नेमका काय ? सगळेच गौडबंगाल आहे !
एवढेच नाही ; या क्लीपने जरांगे आणि त्यांच्या साथीदारांना सोशल मिडीयात रान उठवून बदनाम करणाऱ्या ,स्वतःला मराठा समाजाचे रक्षक,आरक्षण अभ्यासक,आंदोलक,सेवक, समन्वयक म्हणवणाऱ्या अजय बारस्कर ,अमोल खुणे , रेखा कोंडे , ललिता तारख इत्यादी भाडोत्री टोळीचाही बुरखा फाडला ! क्लिपवाले एवढ्यावरच थांबले नाहीत ; त्यांनी आमच्या धंद्यातील (प्रींट मिडीया) मेन स्ट्रीम न्यूज पेपर म्हणून टेंभा मिरवणार्या दैनिक लोकसत्ता या वर्तमान पत्राचे स्वतःला पुरोगामी विचारांचे वाहक,आणि निस्पृह पत्रकारीतेचे महर्षी,उच्चविद्यावाचस्पती,बहूभाषाकोविद,शब्दप्रभू,बहुश्रूत,बहूआयामी वगैरे वगैरे बिरुदे मिरवणारे संपादक गिरीश कुबेर यांचाही शेंदूर खरवडून त्यांना तेल चोपडून वरतून भगवा फासला !
अर्थात आधीचा शेंदूर,त्यावर तेल आणि वरतून भगवा ! या मुळे कुबेरांचे तोंड काळे ; म्हणण्यापेक्षा गोरेमोरे (त्यांच्याच भाषेत सांगायचे तर ...किमानपक्षी कावरे बावरे) नक्कीच झाले आहे.जरागेंनी उद्यूक्त केलेल्या क्लीपमुळे एक दोन नाही तर पक्षांचा अख्खा थवाच टिपला आणि गारद झाला आहे.या थव्यातले सगळेच कावळे,अन सगळ्यांचीच घरे शेणाची ; त्यामुळे कोण कोणाला वाचवणार ? अशी अवस्था आहे ! विंचवाची पिल्ले व्यालेल्या विंचवीणीला खातात तसेच सुशील कुलकर्णी,श्वेता शालीनी,अतूल भातखळकर,निधी कामदार,अजय लिमये ही भाजपच्या पोटात मातलेली पिलावळ भाजपलाच उतली.गायीच्या कासेला लागलेली गोचिडे दुध सोडून रक्त पितात.तसेच या किड्यांनी केले.त्यांचे काय करायचे हे आता शिंदे- फडणवीस ठरवतील.जरांगे विरोधात बदनामीची राळ उठवणाऱ्या टोळधाडीचे काय करायचे ते मराठा समाज ठरवील.पण गिरीश कुबेरांचे काय ?
क्लिपवाल्यांनी त्यांची पँट उतरवून आत संघाची चड्डी असल्याचा दावा केला आहे.कुबेर आपलेच ( म्हणजे मोदी भक्त ,भाजप समर्थक गोदी मिडीया पैकी ) असल्याचे म्हटले आहे ! गिरीश कुबेरांनी अनेकदा शेतकरी विरोधी,मराठा आरक्षण विरोधी लेख-अग्रलेख लिहिलेले आहेत.त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांसबधी एका इंग्रजी पुस्तकातील वादग्रस्त मजकुरामुळे नाशिकच्या साहित्य संमेलनात त्यांच्या श्रीमुखाला काळेही फासले गेले होते,आणि त्याबद्दल त्यांना जाहीर माफीही मागावी लागली होती.त्यांचा वैचारिक कल विरोधकांपेक्षा सहसा भाजपच्या पारड्यात असतो.अगदी जेन झी,काॅक्रोच,एमपीएससी,एसआयआर संदर्भातही कुबेरांची लेखणी भाजप विरोधात लिहू धजावत नाही.उलट मोदी आणि भाजपचे समर्थन भलावण करताना ती थकत नाही.म्हणूनच क्लिपवाल्यांनी दैनिक लोकसत्ता आणि लोकसत्ताचे संपादक गिरिश कुबेर यांचे नाव घेत,ते आपलेच आहेत.
आपल्या बद्दल नेहमी चांगले लिहितात.त्यांच्याकडे(कोणताही?) लेख पाठवला तर ते छापतील.असे क्लिपवाल्यापैकी एकजण (भातखळकर) म्हणतो. वरतून कसे छापत नाहीत ते बघू : अशी बढाई देखील मारतो.याचा अर्थ काय ? तर तो (कुबेर ) नाही तर त्याचा बाप (मालक) छापेल ! का ? तर ; ते आपले लाभार्थी(?) आहेत ! आता हा लोकसत्ता आणि कुबेरांच्या विश्वासार्हतेवर हल्लाच नाही का ? बघा बुआ कुबेर...म्हणजे बघाच !
-रवींद्र तहकिक
7888030472

0 टिप्पण्या