पुणे (विशेष प्रतिनिधी): पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात 'पुढारी' वृत्तसमूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या पत्नी रिंगणात उतरल्यापासून सुरू झालेला राजकीय कलगीतुरा आता आणखी पेटला आहे
पत्रकारिता नाही, उघड ‘सुपारीबाजाराचा अड्डा’
धंगेकरांनी पत्रात सुरुवातीलाच स्पष्ट केले की, हे पत्र कोणतीही राजकीय औपचारिकता म्हणून लिहिलेले नाही
त्या 'पांड्या'च्या २ कोटींच्या फ्लॅटचे गुपित काय?
या पत्रात धंगेकरांनी पुण्यातील त्या तथाकथित ‘वसुली बहाद्दर’ पांड्याचा पुन्हा एकदा पंचनामा केला आहे
'लहान उमेदवारांची सुपारी घेऊन बदनामी करता!'
धंगेकरांनी पुढे नमूद केले की, पैशाच्या ओझ्याखाली दबून केवळ श्रीमंत उमेदवारांचे लाळघोटेपणा करण्याचे काम हे माध्यम करत आहे
"पदवीधरांची मतेही बाजारात खरेदी करणार आहात का?"
उच्चशिक्षित आणि सुशिक्षित मतदारांनी तुमच्या कुटुंबाला मतदान का करावे? असा सवाल विचारत धंगेकर म्हणाले, “ज्या प्रकारे तुम्ही निवडणुकीत पैशाचा बाजार मांडून बातम्यांच्या सुपाऱ्या घेतल्या, त्याच प्रकारे मतदानाच्या दिवशी उच्चशिक्षित पदवीधरांची मतेही बाजारात खरेदी करण्याचे मनसुबे आहेत का? पदवीधरांना इतके लाचार समजू नका
बेरक्याचा कानोसा:
पहिल्या फेरीत 'पांडू वसुलीवाला' काढल्यानंतर धंगेकरांनी दुसऱ्या पत्रात थेट गुटख्याचे पैसे, दोन कोटींचा फ्लॅट आणि अडीच कोटींच्या वसुलीचा आकडाच जाहीर करून टाकला आहे
प्रति, श्री. योगेश जाधव चेअरमन, पुढारी वृत्तसमूह महोदय, हे पत्र मी तुम्हाला कोणतीही राजकीय औपचारिकता म्हणून लिहीत नाही, तर तुमच्या वृत्तपत्राने पत्रकारितेचा जो उघड बाजार मांडला आहे, त्यावर थेट बोट ठेवण्यासाठी लिहीत आहे. ज्या 'दैनिक पुढारी'ला महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींचा आणि निष्पक्ष पत्रकारितेचा मोठा वारसा होता, त्याच पुढारीची वाटचाल आज अत्यंत लाजीरवाण्या 'पॅकेज संस्कृती'कडे वळाली आहे. तुम्ही वृत्तपत्राला विचारांचे माध्यम न ठेवता, त्याला पैशाच्या बाजाराचा अड्डा बनवले आहे. निवडणुका आल्या की तुमचे हस्तक कसे 'सुपारी बहाद्दर' म्हणून बाजारात उघडपणे फिरतात, हे एक समाजकारणी म्हणून आम्ही जवळून अनुभवत आहोत. हे सुपारी गोळा करणारे तुमचे दलाल समाजात उघड माथ्याने फिरून उमेदवारांचे खिसे कापतात, स्वतःची घरे भरतात आणि त्यासोबत तुमचेही खिसे गरमागरम करतात; हाच तुमचा धंदा उरला आहे का? सध्या विधान परिषद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक समोर आहे आणि त्यात तुमची पत्नी 'जाधव पाटील' उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. आपल्याच कुटुंबातील उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तुम्ही तुमच्या अख्ख्या माध्यम समूहाची विश्वासार्हता पणाला लावली आहे. पैशाच्या ओझ्याखाली दबून, केवळ ठराविक आणि श्रीमंत उमेदवारांचे लाळघोटेपणा करण्याचे काम आज तुमचे माध्यम करत आहे. तुमच्या या बरबटलेल्या 'पेड न्यूज' (Paid News) संस्कृतीमुळे प्रामाणिक आणि सर्वसामान्य उमेदवारांचा आवाज तुम्ही जाणीवपूर्वक दाबत आहात. सामान्य उमेदवारांनी दिलेली रक्कम तुम्हाला कमी वाटते, म्हणून तुम्ही आणि तुमचा नीतिमत्ता धुळीस मिळवलेला 'वसुली बहाद्दर' पांड्या, दुसरीकडून मोठी सुपारी मिळाली की सामान्य व गरीब उमेदवारांचे पैसे घेऊनही त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करतो. हे तुम्हाला शोभते का? पेड न्यूजच्या नावाखाली कोटींच्या सुपाऱ्या घेणाऱ्या तुम्हाला पदवीधरांनी का मतदान करावे, याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का? तुमचा हा लाडका हस्तक पांड्या कोणत्याही कर्जाशिवाय गुटखा व्यापाऱ्यांच्या पैशातून दोन कोटींचा फ्लॅट खरेदी करतो. त्याने वसुली करून आणलेले अडीच कोटी रुपये तुम्हाला त्याच्याकडून येणे असल्यामुळेच तुम्ही त्याचे हे सगळे चोचले पुरवत आहात, हे खरे आहे का? तुम्ही सुपाऱ्या घेऊन मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी आमच्याविरुद्ध खोट्या बातम्या छापणार आणि आम्ही ते गप्प पणे सहन करणार, असे कधीच होणार नाही. योगेश जाधव, माझा तुम्हाला थेट आणि रोकडा सवाल आहे, सुशिक्षित आणि सजग मतदारांनी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला का मतदान करावे? ज्या प्रकारे तुम्ही निवडणुकीत पैशाचा बाजार मांडून तुमच्या हस्तकांमार्फत बातम्यांच्या सुपाऱ्या घेतल्या, त्याच प्रकारे मतदानाच्या दिवशीही या मतदारसंघातील उच्चशिक्षित पदवीधरांची मते तुम्ही बाजारात खरेदी करणार आहात का? पदवीधर आणि बुद्धिजीवी मतदारांना तुम्ही इतके लाचार आणि विकले जाणारे समजता का? जर तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवून घेताना केवळ स्वतःच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक फायद्यासाठी मतदारांचा वापर करणार असाल, तर तुमची जागा विधान परिषदेत नाही तर व्यापारपेठेत आहे. पैशाच्या बळावर सुशिक्षित मतदारांची निष्ठा खरेदी करण्याचे तुमचे मनसुबे हाच पदवीधर मतदारसंघ धुळीस मिळवेल. पैशाचा माज, हस्तकांची सुपारीबाजी आणि माध्यमाचा गैरवापर करून सुशिक्षित मतदारांना गृहीत धरू नका; हा वर्ग तुम्हाला तुमची खरी जागा मतपेटीच्या माध्यमातून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, हे नीट लक्षात ठेवा. रवींद्र धंगेकर (माजी आमदार, कसबा विधानसभा मतदारसंघ, पुणे) #पुढारी #पुणेपदवीधर
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 19, 2026

0 टिप्पण्या