मी ब्राम्हण आहे ; म्हणून माझी पत्रकारिता महाराष्ट्रातील सरंमजारी वृत्तींच्या पचनी पडत नाही ! मी ब्राम्हण आहे आणि ब्राम्हण असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलतो म्हणून मला टार्गेट केले जाते. मी बोलायचे नाही का ? माझा ठरवून गेम केला जातोय ; इति सुशील बापूसाहेब कुलकर्णी ! फडणवीसही एकदा असेच काहीसे बोलले होते. मी ब्राम्हण म्हणून माझे मुख्यमंत्री होणे प्रस्थापितांना मान्य होत नाही. वगैरे !
कोण बोलले असे ? कोण करतात ब्राह्मणांना विरोध ? फडणवीसांचे सोडा ; इथे त्यांचा विषय नाही. पण सुशीलपंत तुम्हाला बीड मध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून प्रस्थापित करणारे कोण होते ? तुम्ही ज्या पुण्यनगरी वर्तमानपत्रात दीर्घकाळ संपादक म्हणून नोकरी केली ते वर्तमानपत्र कोणाच्या मालकीचे आहे ? नंतर तुम्ही एकमत मध्ये गेलात आणि जात दाखवलीत. ते वर्तमानपत्र कोणाचे आहे ? तुम्ही आता जे अलायझर नावाचे युट्युब चॅनल चालवता त्याचे दर्शक फक्त ब्राम्हण आहेत असे आपणास म्हणायचे आहे काय ?
जरा इतिहास चाळा. या महाराष्ट्राने ब्राम्हण म्हणून ब्राम्हणांचा कधीच जातीय दुस्वास केलेला नाही.संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथांना तर ब्राम्हणांनी जातिबहिष्कृत केले होते. त्यांना संत म्हणून डोक्यावर घेतले कोणी ? इथल्या बहुजनांनी ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात एक सरसेनापती सोडले तर उर्वरित सातही पदांवर ब्राह्मणच असत आणि ही परंपरा छत्रपती संभाजीमहाराज, महाराणी ताराबाईसाहेबां पर्यंत कायम राहिली ! छत्रपती शाहू राजांनी तर ब्राह्मणांना पेशवेपदच बहाल करून टाकले. ते जाऊद्या टिळक- आगरकर कोण होते ? पु.ल. देशपांडे, आचार्य अत्रे कोण होते ? साने गुरुजी कोण होते ? कुसुमाग्रज कोण होते ? एस एम जोशी, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य जावडेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, धनंजयराव गाडगीळ , अनंत भालेराव, बाळासाहेब ठाकरे , डॉ .नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड पानसरे किती नावे सांगायची ? राजकारण-समाजकारण-पत्रकारिता-शिक्षण-उद्योग आणि व्यवसाय, शासन- प्रशासन, विविध कलाक्षेत्र ! हजारो नावे सांगता येतील. ते पत्रकार अतुल कुलकर्णी ; ब्राह्मणच आहेत ना ? कोण बहुजन त्यांना ट्रोल किंवा टार्गेट करतात ? यावर तुमचे उत्तर माहित आहे.
ज्या ब्राह्मणांना महाराष्ट्रातील बहुजनांनी डोक्यावर घेतले, स्वीकारले ते त्यांच्या गुणवत्तेवर ! मान्य आहे ना ; मग तुम्ही दाखवा ना गुणवत्ता ! स्वीकारेल महाराष्ट्र !! ब्राम्हणांनी बहिष्कृत केले तरी स्वीकारेल ! तेवढी दानत, औदार्य आणि सौहार्द आहे बहुजनात.याला वर्तमानच नाही इतिहास देखील साक्ष आहे. असो ; मूळ मुद्यावर येऊ ! महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक वर्तूळात धुराळा उडवून दिलेल्या त्या जरांगेज ३२ मिनीटांच्या वादग्रस्त क्लिपमध्ये फक्त पाचशे कोटींच्या डिलींगचाच मुद्दा खळबळजनक आणि धक्कादायक आहे असे नाही.पाचशे कोटी बद्दल ती कोण श्वेता शालीनी बोलली.ते दीड मिनीटाचे वाक्य आहे.बाकी बोलतोय तो स्वतःला संघाचा कट्टर स्वयंसेवक.हिंदुत्वाचा कडवा पाईक,भाजपाचा सच्चा कार्यकर्ता आणि मोदी तसेच फडणवीसांचा सच्चा चाहता,भक्त,समर्थक म्हणवणारा सुशील कुलकर्णी ! त्याचा म्हणे डिएनए भाजपाचा आहे ! आता जिथे खुद्द मोदी स्वतःला विदाऊट डिएनएचे प्राॅडक्ट (नाॅन बायोलाॅजिकल) म्हणवतात आणि फडणवीस आपला डिएनए ओबीसी असल्याचे सांगतात.तीथे या दोघांनाही आपल्या बापाचा समकक्ष दर्जा देणाऱ्या सुशाचा डिएनए भाजपचा कसा काय बुवा ? हा प्रश्न पडणे सहाजिक आहे ! वरतून हा सुशा आपण प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडेंचेही मानसपूत्र सांगतो.इतकेच नाही ; रेणापूरचा असणारा हा सुशा विलासराव देशमुखांचे बाभळगाव आपले मामाचे गाव असल्याचे, आपल्या मामाचा वाडा विलासरावांच्या गढी समोरच असल्याचे आणि लहानपणी आपण देशमुखांच्या अंगणात गोट्या खेळल्याचेही सांगतो.एकुण या सगळ्या संदर्भातून सुशाचा डिएनए नेमका किती खानदानी आहे हे सुज्ञास सांगणे न लगे.
असो ; तर खानदान आणि डिएनएचा इथे उहापोह करण्याचे कारण असे की त्या क्लिप मध्ये सुशाने शिवसेना (ओरिजनल) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांची जात काढली ! सुशा सुषमा अंधारेंचा उल्लेख नेहमी सुषमा आक्का असा करतो.अर्थात या मागे आदर स्नेहाची नाही तर हेटाळणीची कुत्सित भावना असते.आक्का माझी काॅलेज क्लासमेंट आहे.त्यामुळे तीचा सगळा इतिहास-भूगोल मला ज्ञात आहे असे कुत्सितपणे म्हणत सुशा सुषमा अंधारे यांच्या संदर्भात कायम अश्लाघ्य भाषेत टीका टिपण्णी करत असतो.करेना का ; टीकेने अंगाला भोके पडत नाहीत.पण जरांगेंनी जाहीर केलेल्या क्लिप मध्ये सुशाने सुषमा अंधारेंचा उल्लेख कलाकार असा केला ! हा त्याच्या मनुवादी विकृतीचा कळस आहे.
सुषमा अंधारे कोल्हाटी समाजाच्या आहेत.म्हणजे जातीय उतरंडीनुसार ज्या समाजातील स्रीया उपजिवीकेसाठी परंपरेने कलावंतीण म्हणून नाचकाम करण्याचा व्यवसाय करतात.सुषमा अंधारे यांनी या परंपरेला छेद देत,सावित्रिचा वसा घेत शिक्षण घेतले.उच्च पदवी घेतली.आज त्या शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्या आहेत.हा त्यांचा प्रवास किती खडतर संघर्षाचा असेल याची आपण कल्पना करू शकतो.खरे तर अशा आदर्श महिलेसमोर कोणीही आदराने विनम्र व्हायला हवे.तीचा सन्मान करायला हवा.ते राहीले बाजूला ; हा कृपण कद्रू कृतकसंकोची त्यांची कलाकार म्हणून हेटाळणी करतो.तुच्छतादर्शक जातीचा निर्देश करतो.मग प्रश्न हा पडतो की सुशाची यत्ता कंची ?
ब्रिटीशांनी आपल्या देशातील काही जातींना जन्मजात गुन्हेगार चोर लुटारू म्हणून ठरवले होते.स्वातंत्र्या नंतर हा शिक्का पुसला गेला.या अविकीसीत पोटासाठी चोऱ्यामाऱ्या वाटमाऱ्या नाचगाणे इत्यादी करणाऱ्या मागास जाती मुख्य प्रवाहात आल्या.पण सुशाचे काय ? त्याची जात कधी घाम गाळून,शेतात राबून खात होती ? सगळंच तर दान-दक्षिणावर चालत होतं.ती धर्माच्या नावाखाली चोरीच नव्हती का ? बाकी जाऊ द्या ; खुद्द सुशाने पुण्यनगरी आणि एकमत मध्ये असताना काय केले ? आता अनलायझर युट्यूब चालवून काय करतोय ? चोऱ्याच ना ! या पेक्षा सुषमा अंधारे प्रवक्ता म्हणून पक्षाची भूमीका मांडत असतील.त्या बदल्यात मान आणि धन घेत असतील तर ते संचित हक्काचे आणि सन्मानाचे आहे.श्रीमंत सुशील पंतप्रतिनीधी खातात त्याला काय म्हणतात हे आम्हीं सांगू नये .क्लिपच्या तपशीलात ते दिसते.ही सुशाची यत्ता ! म्हणजे जात आणि औकात !
-रवींद्र तहकिक
7888030472

0 टिप्पण्या