> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, ३१ जुलै, २०१४

महाराष्ट्राच्या मानबिंदूत अजब घडले...

औरंगाबाद - महाराष्ट्राच्या मानबिंदूत मोठे अजब घडले आहे.ब्युरो चिफ नजिर शेख यांनी मालकाच्या विरोधातच बातमी दिली आणि त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागले.त्यांची ब्युरो चिफ पदावरून हकालपट्टी करून विजय सरवदेंकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.

घडले असे की,विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या आमदाराचा निधी किती वापर केला याची माहिती सर्वच जिल्हा प्रतिनिधी देत आहेत.त्याच प्रकारे ब्युरो चिफ नजिर शेख यांनीही आमदार आणि मंत्री राजेंद्र दर्डा यांचा किती निधी वापस गेला याची बातमी दिली.ते देताना संपादक सुधीर महाजन यांना बातमी दाखवली.महाजन यांनी मी आहे,तु बातमी दे,असे सांगितल्यामुळे शेख यांचे मालकाविरूध्द बातमी देण्याचे धाडस वाढले.पण जेव्हा बातमी प्रकाशित झाली,तेव्हा दर्डा खवळले.त्यांनी संपादक विभागाची खरडपट्टी केली आणि शेवटी बळीचा बकरा शेख यांना बनविण्यात आले.शेख यांची ब्युरो चिफ पदावर हकालपट्टी करण्यात आली.ज्या महाजन यांनी बातमी देण्यास सांगितले,त्यांनी सुध्दा हात वर केले.
सध्या विजय सरवदे यांच्याकडे ब्युरो चिफ पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.

दुसरीकडे रिपोर्टर विनोद काकडे यांनी पगारवाढ न केल्यामुळे आणि जालनाला बदली केल्यामुळे राजीनामा दिला आहे.काकडे खरच आता लोकमत सोडणार का याकडे लक्ष वेधले आहे.

बुधवार, ३० जुलै, २०१४

शेठ्जीच्या पेपरचा इमेज बिल्डींग पॅकेज प्लॅन

येत्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता शेठ्जीच्या पेपरने इच्छुक उमेदवारांकडून इमेज बिल्डींग पॅकेज वसुल करण्यास सुरुवात केली आहे़. सदर निर्णय हा वरिष्ठ स्तरावर झालेला असल्याने याची अंमलबजावणी करण्यासाठी खुद्द शाखा व्यवस्थापक, संपादक, जाहीरात विभागातील प्रमुख अधिकारी आणि जिल्हा प्रतिनिधी दौºयावर निघालेले आहे़त.
अकोला, बुलडाणा व वाशिम या आवृत्या अंतर्गत येणाºया विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांकडे स्थानिक प्रतिनिधीं मार्फत मागील एका महीन्यांपासून पोहचत आहेत़ या मध्ये व्यवस्थापक , संपादक , जाहीरात अधिकारी , बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी , अकोला जिल्हा प्रतिनिधी , वाशिम जिल्हा प्रतिनिधी हा चमु यावर काम करीत आहे़.
बुलडाणा जिल्ह्याात काल मंगळवारी या चमुने शेवटचा हात मारला़ विविध आमदाराच्या भेटी घेवून पॅकेज फिक्स केले़ मात्र या पॅकेज मध्ये प्रतिनिधींना कमिशन नसल्याने तिन्ही जिल्ह्याातील प्रतिनिधी कमालीचे नाराज झाले आहेत़.

असे आहेत पॅकेजेस़़
इमेज बिल्डींग प्लॅन - ८ लक्ष
(यामध्ये इच्छुक उमेदवारा बाबत निवडणुक जाहीर होणे पर्यंत चांगल्या बातम्या प्रकाशित करण्यात येतील़ )

पोस्ट पेड प्लॅन - १० लक्ष
( यामध्ये निवडणुक जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या एक दिवसा अगोदर पर्यंत प्रचारदौरे आणि उमेदवाºयाच्या फेवरमधील बातम्या राहतील़)
जंम्बो पॅकेज प्लॅन - २० लक्ष  

(यामध्ये इच्छुक उमेदवाराला आज २० लक्ष देणे़ )
(या अंतर्गत आज पासुन मतदानाच्या दिवशी पर्यंत बातम्या आणि जाहीराती राहतील़)

पेड न्यूजच्या नावाने कितीही बोंब मारा …. ही पध्दत शेठजी राबवणारच…

सोमवार, २८ जुलै, २०१४

फिल्मी प्रेस कॉन्फरन्समध्ये फोटोग्राफरचा नंगानाच

पुण्यातले काही फोटोग्राफर्स त्यांच्या शौकामुळे भलेतेच चर्चेत आहेत. परवाचा प्रसंग तर सर्व पत्रकारांच्या माना खाली घालणारा ठरला..घराघरात मनामनात अशी बिरुदावली मिरवणा-या एका वर्तमानपत्रातील  मंग्याचा  तोल काय गेला आणि सा-या पुण्यात चर्चा  सुरु झाली.
झाले असे की एका सिनेमाची प्रेस कॉन्फरन्स बावधनमधील एका रेसॉर्टमध्ये शनिवारी रात्री होती. त्यासाठी आयोजकांनी वाहनांची व्यवस्था केली होती.  रात्रीची पत्रकार परिषद असल्याने आमंत्रित आणि अनाहूत असे अनेक पत्रकार व छायाचित्रकार तेथे आले होते. त्यामध्ये घराघरात मनामनात अशी बिरुदावली मिरवणा-या  एका वृत्तपत्रातील अधिकृत सभ्य पत्रकार होते. तसेच हौशी छायाचित्रकारही होता. पत्रकार परिषद संपताच छायाचित्रकारांच्या टोळीने अपेय पानाकडे मोर्चा वळवला. कधी नव्हे इतका मद्याचा अतिरेक केल्यामुळे मंग्याचा  तोल सुटला. दारूच्या नशेत त्याने तेथे अक्षरश: धुडगुस घातला. आयोजकांपैकी एका महिलेसोबत गळ्यात हात घालून फोटो काढण्याचा त्याने प्रयत्न केला. तारवटलेल्या डोळ्यांनी केलेल्या असभ्य वर्तनामुळे ती महिला चिडली. तत्काळ तेथे बाऊन्सर्स आले आणि मंग्याची  गचांडी पकडून त्याला बाहेर काढण्यात आले. एवढेच नव्हे, तर विनयभंगाच्या या प्रकारामुळे संतापलेल्या त्या  महिलेने पोलिसांना पाचारण केले. मग छायाचित्रकारांची वरात पोलीस स्टेशनला गेली. तेथे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तयारी चालू केली. पण, अखेर आयोजकांनी व काही पत्रकारांनीच माफी मागून हे प्रकरण मिटवले. पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. आयोजकांनी स्वतंत्र गाडीतून मंग्याला  पत्रकार संघात सोडले. तेथे पोटातील सारे ओकून नव्याको-या संघाची या मंग्याने वाट लावली. तेथून गाडीतून वर्तमानपत्राच्या कार्यालयाजवळ या मंग्याला  सोडून आयोजक परतले. या सा-या घटनेची पत्रकार व छायाचित्रकारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. मान्ग्याकडून  हा काही पहिलाच प्रमाद घडलेला नाही. गेल्याच महिन्यात तरूणीच्या विनयभंग प्रकरणात ग्रामीण पोलीस स्टेशनची तीन दिवस हवा खाऊनही मंग्या  सुधारलेला नाही अशीच चर्चा आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि महाराष्ट्रभरातील पत्रकारांमध्ये मंग्याचाच्या या दाऊ पिऊन केलेल्या धिंगाण्याची चर्चा सुरू आहे.

रविवार, २७ जुलै, २०१४

लोकमतच्या जिल्हा प्रतिनिधीच्या बदल्या...

औरंगाबाद लोकमतच्या अंतर्गत येणाऱ्या दोन जिल्हा प्रतिनिधीच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
1. सतिश जोशी यांची परभणीहून औरंगाबादला बदली
2. अभिमन्यू कांबळे यांची हिंगोलीहून परभणीला बदली
3. विजय पाटील यांची औरंगाबादहून हिंगोलीला बदली...

पत्रकारांना आवाहन

महाराष्ट्र टाईम्सचे तंबी दुराई, सकाळचे ब्रिटीश नंदी आणि सा.चित्रलेखाचे सागर राजहंस ही नावे खरी आहेत का ?
आम्ही बेरक्या उर्फ नारद हे टोपण नाव घेवून लिहित असलो तर आमच्या विरोधकांच्या पोटात पोटशूळ का ?
आम्ही व्यक्तीविरूध्द नाही, प्रवृत्तीविरूध्द आहोत...
बेरक्या कोणत्याही पत्रकाराचा आणि वृत्तपत्र मालकाचा शत्रू नाही...
बेरक्या हा पत्रकारांचा पाठीराखा आहे....
भले आमच्यावर कितीही संकटे आली तरी शेवटपर्यंत पत्रकारांच्या कल्याणासाठी लढत राहू...
बेरक्या शांत झाला किंवा बंद पडला या अफवावर कधीही विश्वास ठेवू नका..
कोणतीही कायदेशीर अडचण येवू द्या...आम्ही मध्ये जावू पण कोणाचे नाव घेणार नाही....
पत्रकारांच्या हितासाठी बेरक्या कधीही जेलमध्ये जाण्यास तयार आहे...
जेलमध्ये जावू पण ब्लॉग आणि फेसबुक कधीच बंद करणार नाही आणि माहिती देणा-यांची नावे कधीच उघड करणार नाही...
ज्यांचा आमच्यावर विश्वास आहे,त्यांनी आमच्यासोबत रहावे,आणि ज्यांचा नाही त्यांनी आम्हाला अनफेन्ड करावे...
अशा गैरविश्वासू मित्रांची आम्हाला गरज नाही...
- बेरक्या उर्फ नारद

सोमवार, २१ जुलै, २०१४

निखिल वागळे यांचा अखेर राजीनामा....

मुंबई - आय.बी.एन.७ चे संपादक राजदीप सरदेसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर आता आय.बी.एन. - लोकमतचे संपादक निखिल वागळे हेही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त बेरक्याने दिले होते.अखेर हे वृत्त खरे ठरले आहे.वागळे यांनी स्वत: ट्युटरवर ट्युट करून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.
६ एप्रिल २००७ रोजी आय.बी.एन.लोकमत सुरू झाले आणि मराठी न्यूज चॅनलमध्ये एक वेगळा इतिहास रचला गेला.पुण्या - मुंबईत सिमीत असलेला इलेक्ट्रॉनिक मीडिया महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचला.वागळेंनी सर्व रिपोर्टरना त्यांच्याच भाषेत पी.टू.सी.करण्याचे सूचित करून आयबीएन लोकमतची ओळख निर्माण करून दिली.
रात्री १० वाजता वागळे यांचा आजचा सवाल हा चर्चात्मक कार्यक्रम चांगलाच गाजत असे.समोरच्यांना ते बोलू देत नसत असा त्यांच्यावर आरोप होत असे.मात्र ग्रेट भेट कार्यक्रमात ते समोरच्या व्यक्तीस मनमोकळे बोलू देत असत.त्यांची सुदाम मुर्ती,नाना पाटेकर,प्रकाश आमटे,बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ग्रेट भेट आजही अनेकांच्या स्मरणात आहे.एक मुलाखत घेण्यामध्ये म्हणून वागळे यांचा कोणीही हात धरू शकत नाही.
बागळे यांचा स्वभाव थोडासा हेकट होता.त्यामुळे अनेक कर्मचारी त्यांच्यावर नाराज होत असत.मात्र एखाद्यावर रागावलेले वागळे त्याच्यासोबत नंतर चहा पिवून शेवट गोड करीत असत.
आयबीएनची सुत्रे मुकेश अंबानी यांच्याकडे गेल्यानंतर राजदीप सरदेसाई यांनी एक महिन्यापुर्वी राजीनामा दिला होता.त्याचवेळी वागळे यांनी राजीनामा देवून राजीदिपच्या सोबत आपण असल्याचे दाखवून दिले आहे.खरे तर राजदीप यांनीच वागळेंना इलेक्ट्रॉनिक मीडियात आणले.आय.बी.एन.लोकमतला एक नवा चेहरा देण्याचे काम राजदीप यांनी केले.आता राजदीपच नाहीत म्हटल्यावर वागळ यांनीे देखील अखेर गुडबाय केला आहे.
वागळे हे गेल्या एक महिन्यापासून रजेवर होते.तेव्हास राजीरामा दिल्याची कुणकुण ऐकू येत होती.मात्र आतापर्यंत अनेकवेळा असे प्रसंग आले आणि ते निभावले गेले होते.मात्र आज वागळे यांनीच ट्युटरवर ट्युट करून राजीनामा दिल्याची माहिती दिली आणि आता लोकांना पटले की,वागळे यांनी खरेच आय.बी.एन.लोकमत सोडले.

जाता - जाता :
निखिल वागळे यांनी राजीनामा दिला नसून नव्या मँनेजमेंटने राजीनामा घेतल्याचे वृत्त..
वागळे गेल्यामुळे आय.बी.एन.लोकमतचा चेहरा गेला...
आयबीएन लोकमतच्या संपादक पदासाठी मंदार फणसे यांची जोरदार फिल्डींग तर डॉ.उदय निरगुडकर यांनी देव पाण्यात ठेवले...

बुधवार, १६ जुलै, २०१४

'देशदूत'ने नगरमधून गाशा गुंडाळला !

नगर : दैनिक देशदूतची नगर आवृत्ती बंद करण्याचा निर्णय अखेर देशदूत प्रशासनाने घेतला आहे. आजचा अंक निघाला नाही. उत्पन्न व खर्चाचा मेळ जमत नसल्याने आवृत्ती बंद करण्यात येत असल्याचे देशदूतचे सरव्यवस्थापक आर. के. सोनवणे यांनी कालच सर्व कर्मचार्‍यांना सांगितले होते. देशदूतचे कर्मचारी दैनिक सार्वमतमध्ये विलिन करण्यात आले असून, संपादक नंदकुमार सोनार यांच्या अधिनस्त आता त्यांना काम करावे लागणार आहे. देशदूतचे व्यवस्थापक सुनील ठाकूर यांची नाशिकला पीए टू एमडी या पदोन्नतीवरील पदावर बदली करण्यात आली आहे.
शिवाजी शिर्के संपादक असताना त्यांनी काँग्रेसनेते भानुदास कोतकर यांचे अशोक लांडे हत्याकांड बाहेर काढले होते. या कोतकरप्रकरणाने तत्कालिन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश प्रसाद जसे हिरो ठरले तसेच देशदूतही रातोरात नगरमध्ये यशोशिखरावर गेला होता. शिर्के यांचे आक्रमक संपादकीयत्व व उत्तम टीमवर्क यामुळे देशदूत जिल्ह्यातील तिसर्‍या क्रमांकाचे दैनिक झाले होते. तथापि, कार्यालयातील पेशवाईचा शिर्के यांना फटका बसला. त्यामुळे शिर्के यांना बाजूला व्हावे लागले. त्यानंतर देशदूतची धुरा कार्यकारी संपादक पुरुषोत्तम सांगळे यांच्याकडे आली. शिर्केचाच कित्ता गिरवत देशदूतचे बाजारपेठेतील स्थान कायम ठेवण्यात सांगळे यशस्वी झाले. परंतु, त्यांच्याहीविरुद्ध कार्यालयातील पेशवाई गटाने षडयंत्र रचून त्यांची रवानगी नाशिकला करण्यात हा गट यशस्वी झाला. ही बदली स्वीकारण्यापेक्षा सांगळे हे देशदूतच्या बाहेर पडले व पुन्हा अकोला देशोन्नतीला निवासी संपादकपदी रूजू झाले. सांगळे यांच्यानंतर जाहिरात व्यवस्थापक रविंद्र देशपांडे व वृत्तसंपादक जयंत कुलकर्णी यांच्याकडे या आवृत्तीची धुरा आली. देशपांडे यांना प्रभारी कार्यकारी संपादक नेमण्यात आले होते. परंतु, अंकाचे घसरते सर्क्युलेशन, संपादकीयचा दर्जा व खालावणारा व्यवसाय रोखण्यात देशपांडे-कुलकर्णी ही जोडगोळी अपयशी ठरली. इतरांबद्दल तक्रारी करणे सोपे असते, प्रत्यक्षात ती जबाबदारी पेलणे किती अवघड असते, याचा अनुभव या जोडगोळीला आयुष्यात पहिल्यांदाच आला. वाढती वित्तीय तूट, घसरलेले सर्क्युलेशन व वाढता खर्च पाहाता, नगर आवृत्ती तातडीने बंद करण्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालक विक्रम सारडा यांनी दिले. नाशिकवरून त्यांचा हा निरोप घेऊन काल सरव्यवस्थापक आर. के. सोनवणे हे नगरमध्ये दाखल झाले. प्रारंभी व्यवस्थापक सुनील ठाकूर, सार्वमतचे संपादक नंदकुमार सोनार यांच्यासोबत दीर्घ चर्चा केल्यानंतर त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सर्व कर्मचार्‍यांना आवृत्ती बंद करण्यात येत असल्याचा निरोप दिला. तसेच, सर्व कर्मचारी सार्वमतमध्ये विलिन करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे ऑपरेटर, संपादकीय कर्मचार्‍यांसह सर्व कर्मचार्‍यांची पायाखालची वाळू सरकली. नगर जिल्ह्यात पूर्वीच सार्वमत हे स्वतंत्र दैनिक चांगले चालत असताना, विक्रम सारडा यांनी देशदूत हे बॅनरदेखील जिल्ह्यात आणले होते. जिल्ह्याच्या उत्तरेत सार्वमतचा सर्वाधिक खप आहे. तर दक्षिणेत हे दैनिक चालत नव्हते. त्यामुळे देशदूत हे दैनिक दक्षिणेची बाजारपेठ काबिज करण्यासाठी टाकण्यात आले होते. शिर्वेâ व सांगळे यांनी दक्षिणेवर चांगली पकड निर्माण केली होती. परंतु, पेशवाईच्या गटबाजीने या दोघांनाही बाहेर पडावे लागले. परिणामी, देशपांडे-कुलकर्णींच्या उपस्थितीत आवृत्ती बंद करण्यात येत असल्याचा निरोप देशदूत प्रशासनाला आपल्या कर्मचार्‍यांना द्यावा लागला. देशदूतचे बहुतांश संपादकीय कर्मचारी यापूर्वीच संपादक नंदकुमार सोनार यांच्या डोक्यात बसलेले असून, महिना-दोन महिन्यात त्यांची घरी रवानगी केली जाणार आहे. पत्रकारितेतील या पत्रकारांचे चारित्र्य पाहाता, त्यांना कुठेही संधी मिळणे तसे अवघड आहे. यापूर्वी दैनिक एकमत, दैनिक व्हिजनवार्ता ही दैनिके अशीच बंद पडली होती. त्यांच्या पंगतीत आता देशदूत जावून बसले आहे.

शनिवार, ५ जुलै, २०१४

वागळेंनी आयबीएन - लोकमत सोडले ?

मुंबई - राजदीप सरदेसाई पाठोपाठ निखिल वागळे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा...
वागळे गेल्या चार दिवसांपासून आजचा सवाल आणि प्राईम टाईम बुलेटीनमध्ये दिसत नाहीत...
अफवांना पेव फुटले...
काही दिवसांपुर्वी वागळे यांनी ट्युटरवर ट्युट केले होते - मुंबईच्या जीवनाचा कंटाळा आला आहे...
वागळेंचे हे ट्युट काय सांगते ?
खरंच वागळेंनी आयबीएन - लोकमत सोडले का ?

.................................................


औरंगाबाद - सकाळचे दोघे,दिव्य मराठी आणि महाराष्ट्र टाइम्सचा प्रत्येकी एक असे चौघेजण लोकमतच्या वाटेवर...गेल्या दोन दिवसांत नूतन कार्यकारी संपादक सुधीर महाजन यांनी घेतल्या मुलाखती...

फेसबुक वर शेअर करा

Facebook