> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

जय महाराष्ट्रमध्ये राजीनामा सत्र सुरुच...

मुंबई ...
- जय महाराष्ट्रमध्ये राजीनामा सत्र सुरुच...
- संपादकाच्या मनमानीमुळे नागपूर ब्युरोच्या रिपोर्टर्सचे काम बंद आंदोलन...
- नवीन सीईओ प्रभावी ठरत असताना संपादकाच्या मनमानीमुळे चॅनेलच्या प्रगतीत अडथळे..
- कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता वाढत चालली...
- PCR हेड आणि Production हेड मुळे चॅनल डबघाईला....हे दोघे चॅनल बुडवणार....सुधाकर शेट्टीजी आवरा यांना....
- चॅनलमधील गलिच्छ राजकारणामुळे अनेकांचा लांबूनच नमस्कार...चॅनलमध्ये येण्यास अनेकांचा नकार...माणसे मिळेनात,आहे त्यांना काम उरकेना....

शुक्रवार, ३० जानेवारी, २०१५

रंगिला औरंगाबादीला पुढारीमधून गच्छंती ?

रंगिला औरंगाबादीचे पुढारीबरोबरचे कॉन्ट्रक्ट संपलेय...पद्श्री कॉन्ट्रक्ट वाढवून द्यायला तयार नाहीत.त्यामुळे रंगिला औरंगाबादीला १ फेब्रुवारीपासून पुढारीमधून गच्छंती मिळण्याची शक्यता आहे.असे झाले तर संजीव साबडे यांची वर्णी लागू शकते.
त्यामुळेच रंगिला औरंगाबादी फारच संतापलाय.बेरक्याच्या नावे तो दररोज शिव्या घालतोय...घालू दे बिचा-याला...नाही तरी दुसरे कोणते काम आहे ?
त्याची सकाळची दारे कायमची बंद आहेत.त्यामुळे मंत्रीपद गेल्यामुळे संपादकपद स्वीकारलेल्या लोकमतच्या बाबूजींची रंगिला औरंगाबादी दररोज क्षमा मागतोय.बाबूजी क्षमाशिल आहेत....पण छोटे बाबूजी तयार नाहीत.लोकमतचे सुर्यदेव कोपलेत.सुर्यदेवांना पुरस्कार मिळाल्यामुळे रंगिला औरंगाबादीने व्हॉटस अ‍ॅप्सपर एक तिरस्कारात पोस्ट लिहिल्यामुळे सुर्यदेवाचा पारा चांगलाच चढलाय...त्यामुळे रंगिला औरंगाबादीचे पुर्नवर्सन अवघड आहे.
पाहू या आता पुढे काय होते ते ?

गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

रंगीला अन ठाण्याच्या माजी ब्युरो चीफ मध्ये जुंपली

सध्या पद्मश्रींच्या पेपर मध्ये रंगीला औरंगाबादी आणि ठाण्याच्या एका माजी ब्युरो चीफ मध्ये निवडणुकीत मिळालेल्या "पॉकेट" वरून चांगलाच वाद सुरु आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी अनेक दिग्गज नेत्यांकडून आलेले "वजनदार" "पॉकेट" ठाण्याच्या एका माजी ब्युरो चीफने रंगीला पर्यंत न पोहचवता आपल्याच खिशात टाकले. या कारणावरून रंगीला अन ठाणे माजी ब्युरो चीफ मध्ये चांगलीच जुंपली आहे.
रंगीलाच्या छळाला कंटाळून मी मराठीच्या वाटेवर गेलेल्या ठाणे पुढारीच्या माजी ब्युरो चीफने पुढारी सोडताच रंगीलाची सारी कथा पद्म्श्रीना ऐकवली. ठाण्याचे माजी ब्युरो चीफने पुढारीत परतण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या असून रंगीलाची खुलेआम पोलखोल सुरु केली आहे. ठाणे माजी ब्युरो चीफचे अजून देखील पुढारीचे नावाने येणारे पॉकेट घेणे सुरूच असल्याने आणि ते रंगीला पर्यंत पोहचवणे बंद केल्याने रंगीलाचा जळफळाट झाला आहे. तर पद्मश्रींच्या पेपर मध्ये मध्ये जीव रमलेल्या या माजी ब्युरो चीफचा मी मराठीत प्रवेश झाला असला तरी त्याने स्वगृही परतण्यासाठी कोल्हापूरहून जोरदार सेटींग लावली आहे.

महाराष्ट्रनामा ...

बेळगाव तरूण भारतच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक नरेंद्र कोठेकर यांचा राजीनामा
बेळगाव निवासी सीईओ आणि मुंबई डेक्स इन्चार्जच्या त्रासाला कंटाळून दिला राजीनामा
आता कोठेकर समर्थकांना टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरू...
...........


पुणे जिल्ह्यातील माले (मुळशी तालुका) ग्रामपंचायतीने एका चॅनलवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकलाय...
गावाने वाळीत टाकले अशी खोटी न्यूज पैसे घेवून चालवली...
ज्यांनी निवडणुकीत पॅनल लढवले,त्याला गाव कसे वाळीत टाकेल ?
'मी' पणा केला की,असे असे भोगावे लागते...
आता चॅनल त्याचे 'बारसे' करणार की 'नारळ' देणार,याकडे लक्ष...

..............


औरंगाबाद - जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष धारासूरकर यांना लोकमतमधून नारळ, मकरंद जहागिरदार नवे जिल्हा प्रतिनिधी....
जहागिरदार (जालना)आणि धारासूरकर (परभणी) पुर्वाश्रमीचे सकाळचे...दोघेही मित्र...पण दोस्त,दोस्त ना रहा....प्यार, प्यार न रहा....
...............

टीव्ही 9 व्हाया न्यूज एक्स्प्रेस मार्गे सुनील बोधनकर Sunil Bodhankar जय महाराष्ट्रमध्ये...
जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आऊटपूट हेड म्हणून बोधनकर यांनी मंगळवारी सुत्रे हाती घेतली...
अभिनंदन आणि शुभेच्छा...
...................

बुधवार, २८ जानेवारी, २०१५

राज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर


लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार
लक्ष्मण जोशी, विजय कुवळेकर, दिनकर रायकर यांना जाहीर

.................................................................................
मुंबई : राज्य शासनाचे लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक श्री.लक्ष्मण त्र्यंबकराव जोशी, श्री.विजय विश्वनाथ कुवळेकर तसेच श्री. दिनकर केशव रायकर यांना देण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा आज केली . यासोबतच गेल्या तीन वर्षातील विविध गटातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले आहेत.
पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम बुधवार, 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे होणार आहे.
लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार
2011 चे लोकमान्य टिळक पुरस्कार प्राप्त श्री.लक्ष्मण त्र्यंबकराव जोशी हे सध्या लोकशाही वार्ताचे संपादक असून त्यांनी दै.तरुण भारतमध्ये वार्ताहर पदापासून ते मुख्य संपादक पदापर्यन्त काम केले आहे. याशिवाय त्यांनी गोमतंक,गोवादूत,मुंबई तरुण भारत,जळगाव तरुण भारत मध्ये संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. 45 वर्षाहून अधिक काळ अनुभव असलेले श्री जोशी यांना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते पांचजन्य प्रकाशनाचा पुरस्कार मिळाला आहे.
2012 चे लोकमान्य टिळक पुरस्कार प्राप्त श्री.विजय विश्वनाथ कुवळेकर यांनी मुख्य संपादक सकाळ, संपादक लोकमत, मुंबई तसेच संपादक सकाळ, कोल्हापूर अशी जबाबदारी सांभाळली आहे. 33 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेतला अनुभव असलेले श्री.कुवळेकर यांना जीवनगौरव रत्नदर्पण, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, कै. सुशीलादेवी देशमुख पुरस्कार मिळाले आहेत.
2013 चे लोकमान्य टिळक पुरस्कार प्राप्त श्री.दिनकर केशव रायकर हे सध्या दै. लोकमतचे समूह संपादक आहेत. त्यांनी इंडीयन एक्सप्रेसचे मुंबई शहर आवृत्तीचे संपादक, दै. लोकमत आणि लोकमत टाईम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणून काम पाहिले आहे. त्यांना 50 वर्षांचा पत्रकारितेतला अनुभव असून पुढारीकार ग.गो. जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटरी इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
वर्ष 2011,2012 आणि 2013 चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले असून विजेत्यांना रोख पारितोषकाबरोबरच मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देखील देण्यात येईल.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2011
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) बीडच्या दै. झुंजार नेताचे विशेष प्रतिनिधी असलेल्या शेख रिजवान शेख खलील यांना (51 हजार रुपये); बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) दै.लोकमत समाचारचे, जळगांव प्रतिनिधी श्री.मुकेश रामकिशोर शर्मा यांना (41 हजार रुपये); यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई येथील उपसंपादक, श्री. इरशाद लतिफ बागवान यांना (41 हजार रुपये); पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार तरुण भारतचे मुंबई ब्युरो चीफ, श्री.नागेश सुदर्शनराव दाचेवार यांना (41 हजार रुपये); तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार दै.सकाळचे कोल्हापूर येथील वरिष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार श्री.भिकाजी ज्ञानू चेचर यांना (41 हजार रुपये); दादासाहेब पोतनीस पुरस्कार,नाशिक विभाग, दै.लोकसत्ताच्या,नाशिक प्रतिनिधी, श्रीमती चारुशीला कुलकर्णी यांना (51 हजार रुपये,यापैकी 10 हजार रुपये दैनिक गावकरी यांनी (पुरस्कृत); अनंतराव भालेराव पुरस्कार,औरंगाबाद विभाग (लातूरसह), दिव्य मराठी, औरंगाबादचे विशेष प्रतिनिधी श्री.रवी रामभाऊ गाडेकर यांना (41 हजार रुपये); आचार्य अत्रे पुरस्कार,मुंबई विभाग, ठाणे येथे महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ उपसंपादक श्रीमती अमिता शैलेश बडे यांना (41 हजार रुपये); नानासाहेब परूळेकर पुरस्कार,पुणे विभाग, श्री.गणेश बाळासाहेब कोरे, बातमीदार, दै.सकाळ ॲग्रोवन,(41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार,कोकण विभाग, दै.लोकमतचे, रत्नागिरी तालुका प्रतिनिधी,श्री. शिवाजी नामदेव गोरे (41 हजार रुपये), ग.गो.जाधव पुरस्कार,कोल्हापूर विभाग, महाराष्ट्र टाईम्सच्या कोल्हापूर प्रतिनिधी श्रीमती जान्हवी आनंद सराटे (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग,अकोला येथील दै.लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक, श्री.नरेंद्र भीमराव बेलसरे यांना (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार,नागपूर विभाग,दै.लोकमतचे, नागपूर येथील उपसंपादक श्री.मिलिंद किर्ती यांना (41 हजार रुपये).
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2012
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), दै. दिव्य मराठी, सोलापूरचे बातमीदार, श्री.म.युसूफ अ.रहिम शेख, (51 हजार रुपये), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), पुणे येथे दै.सकाळ टाइम्सचे विशेष प्रतिनिधी, श्री.शाश्वत गुप्ता रे, (41 हजार रुपये), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी), हिंगोली येथील दै.भास्करचे जिल्हा प्रतिनिधी, श्री.राकेश सुदामाप्रसाद भट्ट, (41 हजार रुपये), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू), दै.इन्कलाबचे मुंबई येथील पत्रकार श्री.जमिर अहमद खाँन जलिल अहमद खाँन, (41 हजार रुपये), यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शासकीय गट (मराठी)(मा. व ज.), सांगली येथील माहिती अधिकारी, श्री.सखाराम राऊ माने, (41 हजार रुपये), पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, रत्नागिरी येथील टी.व्ही. 9 चे ब्युरो चीफ, श्री.मनोज प्रभाकर लेले, (41 हजार रुपये), तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, मुंबई येथील दै.प्रहारचे छायाचित्रकार, श्री.अतुल मोहन मळेकर, (41 हजार रुपये), केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.), पुणे, विभागीय माहिती कार्यालयातील छायाचित्रकार, श्री.नितीन उत्तमराव सोनवणे (41 हजार रुपये)
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग, श्री.भिलाजी दिगंबर जिरे वार्ताहर, दै.सकाळ, धुळे आणि श्री.नवनाथ दिघे, प्रतिनिधी, दै.दिव्य मराठी, अहमदनगर यांना विभागून (51 हजार रुपये), अनंतराव भालेराव पुरस्कार,औरंगाबाद विभाग (लातूरसह), बीड येथील दै.तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी, श्री.भास्कर लक्ष्मण चोपडे (41 हजार रुपये), आचार्य अत्रे पुरस्कार,मुंबई विभाग, मुंबई येथील येथे दै.लोकमतचे वरिष्ठ प्रतिनिधी श्री.जमीर दाऊद काझी, (41 हजार रुपये),नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग, श्री.मोहन मारुती मस्कर -पाटील,वार्ताहर, दै.लोकमत, सातारा यांना (41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग, उपसंपादक, तरुण भारत, बेळगाव, श्री.रामकृष्ण महिपत खांदारे यांना (41 हजार रुपये), ग.गो.जाधव पुरस्कार,कोल्हापूर विभाग, कोल्हापूर येथील दै.ॲग्रोवनचे बातमीदार,श्री.राजकुमार बापुसाहेब चौगुले यांना (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग, बुलडाणा येथील दै.पुण्यनगरीचे उपसंपादक, श्री.सचिन बलदेव लहाने, (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग, नागपूर येथील दै.लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक श्री.चंद्रशेखर बोबडे यांना (41 हजार रुपये),
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2013
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), पुणे येथील दै. सकाळचे विशेष प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर पांडुरुंग बिजले, (51 हजार रुपये), यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी, श्री. रामचंद्र विठ्ठल देठे यांना (41 हजार रुपये), पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, अमरावती येथील जय महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी श्री.प्रशांत जगनराव कांबळे, (41 हजार रुपये),तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, मुंबई येथील आफ्टरनूनचे श्री.सुशील भोरु कदम, (41 हजार रुपये)
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग, श्री.अनिकेत वसंत साठे, प्रिन्सिपल करस्पाँन्डंट, लोकसत्ता, नाशिक, (51 हजार रुपये), अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह), श्री.हरी रामकृष्ण तुगांवकर, बातमीदार, दै. सकाळ, लातूर, (41 हजार रुपये), आचार्य अत्रे पुरस्कार,मुंबई विभाग, (41 हजार रुपये), मुंबई लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी श्री. संजय कृष्णा बापट, (41 हजार रुपये), नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग, श्री.शैलेंद्र अशोकराव पाटील, बातमीदार, दै. सकाळ, सातारा यांना (41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग,श्री. संतोष पेरणे, जिल्हा वार्ताहर, दै. पुण्यनगरी, रायगड, (41 हजार रुपये), ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग, श्रीमती जान्हवी सराटे, प्रतिनिधी, दै.महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर यांना (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग, अमरावती येथील येथे दै. दिव्य मराठीचे प्रतिनिधी, श्री.सतीश ज्ञानेश्वर भटकर, यांना (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग, नागपूर येथील दै.लोकमतचे उपसंपादक श्री.चंद्रशेखर गिरडकर यांना (41 हजार रुपये)

बुधवार, २१ जानेवारी, २०१५

बेरक्याच्या वृत्ताला भास्करची पृष्टी

दैनिक भास्करच्या औरंगाबाद युनीटला एका जाहिरात प्रतिनिधीने लाखो रूपयाचा चुना लावल्याचे वृत्त बेरक्याने काही दिवसांपुर्वी प्रसिध्द केले होते.आता दैनिक भास्करनेच या वृत्ताला पृष्टी दिली आहे.
शिवाजी काकडे असे या जाहिरात प्रतिनिधीचे नाव आहे.त्याने भास्करला लाखो रूपयाचा चुना लावला आहे.याबाबतचे वृत्त बेरक्याने काही दिवसांपुर्वी प्रसिध्द केले होते.त्यानंतर नागपूरचे जनरल मँनेजर सतिश रांका यांनी औरंगाबाद युनिटला भेट दिली.मात्र ज्यांच्या कृपेमुळे हा अपहार झाला आहे,ते स्वयंघोषित संपादक आणि युनिट हेड यांना मात्र त्यांनी जीवदान दिले की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
काकडे हाच बदमाश आहे,असे सांगत दैनिक भास्करने आज सावधानतेची जाहिरात प्रकाशित केले आहे.नेमकी काय आहे,ही जाहिरात पहा...

शनिवार, १० जानेवारी, २०१५

बिना लाइसेंस वाले लोकल न्यूज चैनल अवैध

सूचना एवं प्रसारण मंत्रालय से बिना लाइसेंस लिए चल रहे लोकल न्यूज चैनल अवैध हैं । केवल सेटेलाइट न्यूज चैनल ही केबल कनेक्शन पर चल सकते हैं। केबल पर कुछ निजी लोकल चैनल न्यूज चैनल की शक्ल में चल रहे हैं। ये अवैध हैं क्योंकि इनके पास कोई लाइसेंस नहीं हैं। जिलाधीश या पुलिस कमिश्नर या सब डिविजनल मैजिस्ट्रेट किसी भी उल्लंघन करने वाले लोकल न्यूज चैनल, केबल ऑपरेटर के खिलाफ ऐक्शन ले सकते है।
 केबल ऑपरेटर का लायसेंस अलग होता है| सेटेलाइट या केबल पर न्यूज प्रसारण हेतू सूचना एवं प्रसारण मंत्रालय से न्यूज चैनल लाइसेंस प्राप्त करना आवश्यक होता हैं।

केबल टेलीविजन नेटवर्क विनियम संशोधन विधेयक 2006 के अनुसार, बिना पंजीयन लोकल न्यूज चलाई तो यह कानूनन जुर्म हैं जिसके लिए सजा का प्रावधान हैं। 1995 केबल एक्ट के तहत कोई भी एमएसओ खबर, मनोरंजन और विज्ञापन के कार्यक्रम का निर्माण नहीं कर सकता है और न ही खुद से उन्हें रिले कर सकता है। उसका काम सिर्फ सिग्नल लेना और उसे आगे भेजना है। अगर एमएसओ केबल पर लोकल चैनल चलाता नजर आया तो उसका स्टूडियो, मशीनरी सील कर दी जाएगी। इस तरह के चेनल्स के प्रसारण पर दो साल तक की कैद और एक लाख रूपए जुर्माने का प्रावधान किया गया है। दुबारा इस तरह का काम करते पकड़े जाने पर पांच साल तक की कैद और तीन लाख रूपए का जुर्माना आहूत करने का प्रावधान है।
.............................
असे कोणी बेकायदेशीर लोकल चॅनल चालवत असेल तर आपण जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी,जिल्हा माहिती कार्यालय,थेट महिती आणि प्रसारण विभाग,पीआयबीकडे तक्रार करू शकता...

बुधवार, ७ जानेवारी, २०१५

मिलीभगत से भास्कर को लगाया लाखों का चूना

औरंगाबाद - समाचार संपादक (स्वयंघोषित संपादक) और एक विशेष विज्ञापन प्रतिनिधि ने औरंगाबाद भास्कर को लाखों रुपए का चूना लगाना का मामला ऑफिस में चर्चा का विषय बना हुआ है। दो वर्ष पहले भास्कर का बिजिनेस बढ़ाने के उद्देश्य से स्वयंघोषित संपादक ने उनके खासमखास दोस्त को यूनिट हेड की अनुमति से विशेष विज्ञापन प्रतिनिधि के रूप में नियुक्त किया था। 'का-करे' संबधित प्रतिनिधि ने बोलबच्चन करते हुए यूनिट हेड का विश्वास संपादन किया। दो वर्ष तक विशेष परिशिष्ट निकालकर विज्ञापन प्रसिद्ध किए गए। वसूली भी की गई लेकिन उसने और स्वयंघोषित ने मिलीभगत कर खुद की जेब भरी। पांच लाख रुपए को चूना लगाने की चर्चा है लेकिन अंदरूनी आंकड़ा अलग होने का अंदेशा व्यक्त किया जा रहा है। कहा जा रहा है कि स्वयंघोषित का दोस्त होने से यूनिट हेड ने भी वसूली के लिए उसे परेशान नहीं किया। आखिरकार विशेष विज्ञापन प्रतिनिधि चूना लगाकर चल गए और यूनिट हेड बस देखते रह गए। नागपुर प्रबंधन की अनदेखी से और यहां के सब एक ही थाली के चट्टे-बट्टे होने से भास्कर की नैया डूबना लाजिमी है।
'विशेष संवाददाता' खबर छपवाने मांगता है रुपए
दैनिक भास्कर औरंगाबाद में शुरू हुआ तब स्वयंघोषित संपादक ने उसके रिश्तेदार को पोलिटिकल रिपोर्टर के रूप नियुक्त किया। लेकिन ये विशेष संवाददाता पत्रकारिता छोड़ रुपए के पीछे पड़ा। उसने छोटी-मोटी खबर छपवाने के लिए राजनेता तथा अन्य लोगों से रुपए मांगकर तथा लेकर भास्कर का नाम मार्केट में ख़राब किया है। औरंगाबाद के पत्रकारों में रुपए लेने वाले इस 'भारी' संवाददाता की खासमखास चर्चा भी होती रहती है। कई राजनेता तथा लोगों ने इसकी शिकायत भास्कर कार्यालय से की लेकिन कार्यालय में तो उन्हें बचाने वाले आंका ही बैठे हुए हैं। विशेष बात यह है कि दैनिक भास्कर में चार वर्षों से राजनीतिक विज्ञापनों का सूखा है। ऐसे लोगों के चलते राजनेताओं ने मानो दैनिक भास्कर का बहिष्कार ही किया है। भास्कर में नियम है कि हर संवाददाता अपनी खबर खुद टाइप करें। लेकिन टाइपिंग न आने से इस विशेष संवाददाता के लिए एक आपरेटर रखा हुआ है। साहब चार वर्ष से टाइपिंग सीख रहे हैं, अभी तक सफलता नहीं मिली।

शुक्रवार, २ जानेवारी, २०१५

लोकमत मीडिया ग्रुपमधून चौघांना नारळ

लोकमत मीडिया ग्रुपमधून चौघांना नारळ
पुण्याचे मुख्य संपादक विजय कुवळेकर,सहाय्यक संपादक दिवाकर देशपांडे,Entertainment डेक्स प्रमुख पुजा सामंत (मुबई )आणि स्पोर्ट एडिटर नायडू (मुबई )यांचे करार संपल्याने बाबूजींनी दिला नारळ...
निवडणूक हरल्यापासून राजेंद्र बाबू दर्डा यांनी लोकमतमध्ये घातले पुर्ण लक्ष
-शिपायापासून संपादकांपर्यत स्वत: ट्रेनिंग देवू लागले...
- सर्व कर्मचारी अस्वस्थ...

गुरुवार, १ जानेवारी, २०१५

नव जागृती (मराठी) न्यूज चॅनलचे बुलेटिन अखेर सुरू...

नव वर्षात नव जागृती (मराठी) न्यूज चॅनलचे बुलेटिन अखेर सुरू...
स्वत:ला नामवंत,ग्रेट आणि पॅकेज मागणा-या प्रस्थापितांना न घेता होतकरू,गुणवंत आणि कष्टाळू यंग ब्रिगेड घेवून चॅनल सुरू...
सर्व फ्रेश चेहरे....अँकर नविन असूनही प्रस्थापितांच्या तोडीस तोड...
याबद्दल जागृतीचे चेअरमन राज गायकवाड,व्हॉईस चेअरमन राहूल भार्गव,मुख्य संपादक संजीव शाळगावकर यांचे खास अभिनंदन...
मुंबईवर लक्ष केंद्रीत न करता ग्रामीण भागावर विशेष लक्ष...
बातम्यांचे सादरीकरण उत्तमच..
आता तर बाळ जन्मले...भविष्यात प्रस्थापित चॅनलला टक्कर देण्याची क्षमता...
सध्या या चॅनलचे ट्रायल सुरू असून,नितीन गडकरी यांच्या हस्ते लवकरच भव्य शुभारंभ होणार आहे.
सध्या Dish Tv वर क्रमांक 879 वर दिसत आहे.त्याचबरोबर अनेक शहरात केबलवर दिसत आहे.
लवकरच ऑल DTH आणि केबलवर दिसणार आहे

फेसबुक वर शेअर करा

Facebook