> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

रविवार, २६ मे, २०१९

कुमावतचे घोडे आडले तर भोईटेचे पळाले !

मुंबई - टीव्ही ९ चे मॅनेजमेंट बदलले आहे. जुन्या मॅनेजमेंटने उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मराठीचे ऑफर लेटर दिले होते, पण  मॅनेजमेंट बदल्यामुळे त्यांचे घोडे आडले आहे तर नव्या  मॅनेजमेंटकडून तुळशीदास भोईटेने ऑफर  लेटर घेतले आहे. त्यामुळे सतत चॅनल आणि पेपर बदलणारे तुळशीदास भोईटे लवकरच टीव्ही ९ मराठी मध्ये दिसल्यास आश्चर्य वाटू नये.

 प्रकाश रेड्डीने टीव्ही ९ चॅनल अन्य एका ग्रुपला विकले आहे. त्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. प्रकाश रेड्डी ग्रुपने उमेश कुमावत यांना ऑफर लेटर दिले होते, त्यामुळे ते न्यूज १८ लोकमत सोडून पुन्हा टीव्ही ९ मराठी जॉईन करणार होते, मात्र मॅनेजमेंट बदलताच सध्या एबीपी माझामध्ये असलेल्या  तुळशीदास भोईटे यांनी संधान साधून ऑफर लेटर घेतले आहे. 

मॅनेजमेंट  बदलल्यामुळे उमेश कुमावत यांचा पत्ता कटला असून तुळशीदास भोईटे यांचा नंबर लागला आहे. कुमावतची अवस्था कुमकुवत झाली आहे तर 'तुळशी' ची अवस्था 'दास' झाली आहे.

मंगळवार, १४ मे, २०१९

मराठवाडा एस्प्रेस...

औरंगाबाद - माधव सावरगावे यांचा जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र ... साम जॉईन करणार ... सावरगाव यांच्या जागेवर अमेय पाठक ...

औरंगाबाद - टीव्ही ९ मराठीला दत्ता कानवटे जॉईन ... अमित आडे कॅमरामन ...

उस्मानाबाद - एकमतचे जिल्हा प्रतिनिधी अनंत आडसूळ यांची लातूरला बदली, अमित सोमवंशी नवे जिल्हा
प्रतिनिधी


उस्मानाबाद - पुढारीला उपसंपादक म्हणून विलास फुटाणे ( पूर्वीचे आडनाव माळी ) जॉईन ...

मंगळवार, ७ मे, २०१९

बेरक्या इतका शांत कसा ?

मराठी मीडियातील बित्तंबातमी देणारा बेरक्या हा एकमेव ब्लॉग ... गेल्या आठ वर्षांपासून बिनधास्तपणे सुरू आहे. पण हल्ली हा ब्लॉग दररोज अपडेट होत नाही, अशी वाचकांची प्रेमळ तक्रार ... बेरक्या इतका शांत कसा? त्याच्यावर दबाव आला की काय ? अशीही काही लोकांच्या मनात शंका.

पण वस्तुस्थिती अशी आहे की , कोणाच्या विरोधात उठसुठ बातमी देणे हे बेरक्याचे काम नाही. फालतू बातम्या देणे बेरक्याने कटाक्षाने टाळले आहे. बेरक्याला रोज मेल येतात,९० टक्के मेल हे  वैयक्तिक मतभेद, तिरस्कार, स्पर्धा यातून पाठवलेले असतात. मात्र अश्या मेलला बेरक्या दाद देत नाही. एखादी न्यूज खरी असली तरी त्याची ३ वेळा क्रॉस चेक केली जाते. सत्यता पटल्यानंतर मग ती बातमी प्रसिद्ध केली जाते. कोणत्याही लुंग्यासुंग्या पत्रकाराविरुद्ध बेरक्यावर बातमी प्रसिद्ध होत नाही. किमान त्याला त्या तालुक्यात तरी प्रतिष्ठा हवी.

मराठी मीडियात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर बेरक्याचे लक्ष असते. जेव्हा लक्षवेधी बातमी असते तेव्हा नक्कीच बातमी दिली जाते. पण जेव्हा घडामोडी नसतात तेव्हा बेरक्या शांत असतो. एखादा शिकारी सावज टप्यात आल्यावर जसा शिकार करतो, तसे  बेरक्या बातमी हातात लागल्यावर त्याची खात्री करून बातमी देतो.

जेव्हा मराठी मीडियात विशेष उल्लेखनीय घटना , घडामोड नसते तेव्हा ओढून ताणून बातमी दिली जात नाही. अश्या वेळी ब्लॉग अपडेट होत नाही. मग बेरक्या शांत कसा अशी चर्चा सुरु होते. बेरक्या शांत कधीच नसतो, फक्त तो बातमीची वाट पाहात बसलेला असतो.

तेव्हा बेरक्या शांत कसा ? याचे उत्तर आपणास मिळाले असेलच. तेव्हा बेरक्या ब्लॉग वाचत राहा. बेरक्याचा अँप डाऊनलोड करा. जे अँप डाऊनलोड करतात त्यांना बातमी प्रसिद्ध झाल्यावर आपोआप नोटिफिकेन्स येते.

तूर्तास इतकेच. पुन्हा भेटू. नवीन बातमी घेवून ...

बेरक्या उर्फ नारद
फेसबुक वर शेअर करा

Facebook