लोकमतने अखेर माफी मागितली !

पुणे - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त लेख लिहून आपल्या अक्कलेचे दिवाळे वाजवणाऱ्या 'लोकमत'ने अखेर आपल्या दैनिकात जाहीर माफी मागून या प्रकारणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक लोकमतच्या कालदर्शिका या दिनदर्शिकेमध्ये  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त लेख प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे राज्यभर संताप व्यक्त होत होता. शुक्रवारी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांच्यासह काही शिवप्रेमी लोकमत कार्यालयावर धडकले होते. त्यांनी माफी मागा तसेच कालदर्शिका  दिनदर्शिकचे वितरण थांबवा तसेच वितरित केलेल्या  सर्व  कालदर्शिका  परत घेऊन जाळून टाका असे सुनावले होते.

अखेर लोकमतने शनिवारच्या अंकात आपल्या दैनिकात जाहीर माफी मागून कालदर्शिकेचे वितरण थांबवत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान,वितरित केलेली कालदर्शिका कुठे आढळ्यास ती ताब्यात घ्या, असा आदेश संतोष शिंदे यांनी दिला आहे.

दरम्यान, लोकमतच्या  कालदर्शिका लेखाची जबाबदारी कोणावर होती ? त्याच्यावर दर्डा बंधू कोणती कारवाई करणार ? याकडे लक्ष वेधले आहे.

यापूर्वीचे वृत्त