हिंमत असेल तर पोलीस पाठवून मला अटक करा - अर्नब गोस्वीमी


मुंबई- काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या  रिपब्लिक टीव्हीचा  संपादक अर्नब गोस्वीमी यांच्याविरोधात नागपूरमध्ये FIR दाखल करण्यात आल्यानंतर त्याने महाराष्ट्र सरकारला उघड आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर पोलीस पाठवून मला अटक करून दाखवावी, असे ट्विट त्याने केले आहे.

अर्णब गोस्वामींविरोधात FIR दाखल 

महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर  रिपब्लिक टीव्हीचा  संपादक अर्नब गोस्वीमी यांच्याविरोधात नागपूरमध्ये FIR दाखल करण्यात  धर्माच्या आधारे दोन समुदायांमध्ये भांडणं लावण्याच्या उद्देशानं केलेलं वक्तव्य, धार्मिक भावना दुखावण्यासाठी केलेली कृती या बाबींचा या तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी एका कार्यक्रमात पालघर लिंचिंग प्रकरणाबाबत बोलताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीविरोधात वक्तव्यं केली आहेत. त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेयर होत आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने ट्विट करून म्हटले आहे, की मी मुंबईमध्ये माझ्या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात बसलो आहे. महाराष्ट्र सरकारने मला पोलीस पाठवून अटक करावी किंवा मी स्वतः गाडी चालवत येईन. सोनिया गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या परिवाराने मला अटक करण्याचे ठरवले आहेच  तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे ऐकून मला अटक करावीच.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. हा मुजोरपणा झाला.चोर तो चोर,वर शिरजोर त्यातला हा प्रकार आहे.कशाच्या जोरावर ही व्यक्ती सरकारला आव्हान देण्याचे धाडस करीत आहे. नक्कीच हा गोदी मिडिया आहे. म्हणून त्याने महाराष्ट्र सरकारला आव्हान देण्याची भाषा जाहीरपणे केली आहे.

    उत्तर द्याहटवा